tourism From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते. [1] परदेशी पर्यटकांत १९९० पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणा-जाणाऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले.[ संदर्भ हवा ]
देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक परंपरेचा महान वारसा लाभला आहे. सातवाहनांच्या काळातील कैलास लेणी, शिव मंदिरे; मराठ्यांच्या काळातील गडकिल्ले (दुर्ग) विशेषतः त्यांतील जलदुर्ग,की जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत तर पेशवा काळात तयार झालेले भुईकोट किल्ले इत्यादींनी महाराष्ट्र राज्याला समृद्ध केले आहे.
रायगड किल्ला, मुरुड-जंजीरा किल्ला, माथेरान, घारापुरी लेण्या, पाली, महड, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरीहरेश्वर
रत्नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, राजापूर माचाळ चिपळूण
विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली
प्रकाशे (नंदुरबार), मुडावद (धुळे),
जळगाव जिल्हा :- प्रती पंढरपूर(वाडी) व राममंदिर अमळनेर, पद्मालय एरंडोल आणि चांगदेव मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर, पाटणादेवी चाळीसगाव
पंचवटी (नाशिक), त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी [[संत पाटील बाबांचे जोपुळ:- दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र जोपुळ हे ठिकाण 18 व्या शतकातील महान वारकरी सांप्रदायिक संत पाटील बाबा महाराज यांचे जन्मस्थान आहे. त्यांची समाधी जोपुळ येथे आहे]]
शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक , चौंडी
भीमाशंकर, देहू, आळंदी, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर (पुणे)
शिखर शिंगणापूर (सातारा), औदुंबर (सांगली),
कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, कुंभोज महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, किल्ले पन्हाळा
परळी वैजनाथ (बीड), औंढा नागनाथ (हिंगोली), तुळजापूर (उस्मानाबाद),
शेगाव (बुलढाणा), कारंजा (वाशिम) नांदुरा (बुलढाणा) येथे १०५ फुट उंच हनुमानजीची अति सुंदर भव्यदिव्य मुर्ति व सुंदर दाक्षिणात्य कलाकुसरीचे भव्य बालाजी मंदिर
अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा
पुणे शहर शनिवार वाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, सारस बाग, पर्वती मंदिर व संग्रहालय, कात्रज सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय, केळकर संग्रहालय, कस्तुरबा पॅलेस व म्युझियम, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी गार्डन, जैन मंदिर कात्रज
पुणे परिसर खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत व वरसगाव धरण, निळकंठेश्वर, थेऊरचा गणपती, बोलाई देवी
मुळशी तालुका:- मुळशी धरण, पळसे धबधबा, कोळवडे मसोबा, लवासा सिटी, हाडशी साईबाबा मंदिर
मावळ तालुका :- प्रतिशिर्डी सोमटणे फाटा, भाजे लेण्या, एकविरा मंदिर व कार्ले लेण्या, खंडाळा घाट,
पुरंदर तालुका :- कानिफनाथ मंदिर, प्रती बालाजी केतकावळे, पुरंदर किल्ला नारायणपूर दत्त मंदिर, जेजुरी, मयुरेश्वर मोरगाव,
जुन्नर तालुका :- ओझर, लेण्याद्री, शिवनेरी किल्ला खोडद दुर्बिन
तोरणमाळ (नंदुरबार), पाटणादेवी परिसर चाळीसगाव,
इगतपुरी, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य
भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर,
रांजणखळगे (निघोज),
रेहेकुरी काळवीट अभयारण्य
लोणावळा (पुणे),
महाबळेश्वर, कास पठार (सातारा),
कसारा घाट (नाशिक - मुंबई)
माळशेज घाट (अहमदनगर - कल्याण)
कन्नड घाट (औरंगाबाद-दौलतबाद किल्ला-वेरूळलेण्या-पितळखोरा लेण्या (कालीमठ) कन्नडघाट-चाळीसगाव-धुळे)
भोर घाट (पुणे - मुंबई)
खंबाटकी घाट (पुणे - सातारा)
ताम्हिणी घाट (पुणे - माणगाव)
वरंधा घाट (भोर - महाड)
कशेडी घाट (महाड - दापोली)
कुंभार्ली घाट (कराड - चिपळूण)
आंबा घाट (कोल्हापूर - रत्नागिरी)
फोंडा घाट (कोल्हापूर - कणकवली)
करुळ घाट (कोल्हापूर - वैभववाडी)
आंबोली घाट (कोल्हापूर - गोवा)
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर
चांदबीबीचा महाल (अहिल्यानगर)
शनिवार वाडा, केसरी वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेण्या (पुणे)
कोपेश्वर महादेव मंदिर, खिद्रापूर (कोल्हापूर),
बिबी का मकबरा, पाणचक्की, अजिंठा लेण्या, वेरुळ लेण्या, खुलताबाद (औरंगाबाद)
१९९० नंतर दळणवळण आणि रस्ते विकासाला महाराष्ट्रात चालना मिळाली. पर्यटकांसाठी खाजगी वाहतूक कंपन्या पुढे आल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतही सुधारणा झाली, बीओटी (बांधा-चालवा- हस्तांतरित करा) तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा देतील अशा हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषक आणि परदेशी पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता,[2] आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणाऱ्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.[ संदर्भ हवा ]
ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची वैयक्ति स्वच्छतेच्या अल्पसुविधा, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, राहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपाहारगृहांतील अनारोग्यकारक पदार्थ आणि वातावरण, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा, संवाद कौशल्याचा आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.[ संदर्भ हवा ]. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोणही[ संदर्भ हवा ] क्वचित दिसतो.
मुंबईपासूनची अंतरे:
उदगीर किल्ला, हत्तीबेट, सोमनाथपूर (लातूर)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.