भारत व बांगलादेश मधील एक प्रमुख भाषा From Wikipedia, the free encyclopedia
बंगाली (बंगाली लिपीत: বাংলা ভাষা; लिप्यंतरण: बांला भाषा) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे. संस्कृत, पाली व प्राकृत या भाषांमधून बंगाली भाषेचा जन्म झाला. बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून, या प्रदेशात सध्याचा बांग्लादेश व भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होतो. बंगाली भाषिकांची एकूण संख्या २३ कोटीच्या आसपास असून, जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते.[१] (भाषिक संख्येनुसार जगभरात पाचवी). बंगाली बांग्लादेशातील प्रमुख भाषा असून भाषिक संख्येत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बंगाली व आसामी भाषा भाषा इंडो-इराणी भाषाकुळातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत पूर्वेकडच्या भाषा आहेत.
बंगाली | |
---|---|
বাংলা (बांग्ला) | |
स्थानिक वापर | भारत, बांगलादेश |
प्रदेश | बंगाल, ईशान्य भारत, आसाम काही प्रमाणात- म्यानमार, ओडिशा |
लोकसंख्या | २३ कोटी २० लक्ष (अनुमान) |
क्रम | ५ |
लिपी | पूर्व नागरी लिपी, |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
बांगलादेश भारत राज्यभाषा- पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, अंदमान आणि निकोबार |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | bn |
ISO ६३९-२ | ben |
ISO ६३९-३ | ben (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
बंगाली भाषेच्या विकासाचे तीन टप्पे आहेत.
ऐतिहासिकदृष्ट्या लिखित भाषेच्या २ शैली आहेत.
भाषाशास्त्री सुनिती कुमार चॅटर्जी बंगालीच्या बोलींचे रठ, बंग, कामरूप व वरेन्द्र अशा ४ गटांत विभाजन करतात. बोलींचे बदलातील सातत्य (dialect continuum) हे बंगालीचे आणखी एक वैशिष्ट्य. मराठीप्रमाणेच भौगोलिक अंतरासोबत बंगाली हळूहळू बदलत जाते. ठळकपणे दाखवता येईल असा बोलीभेद म्हणजे पश्चिम व पूर्व बंगालमधील भाषाभेद. पूर्व बंगाल (आजचा बांग्लादेश) मुस्लिमबहुल असून पश्चिम बंगाल हा हिंदूबहुल आहे. त्यामुळे ह्या धार्मिक फरकाचे प्रतिबिंबही या प्रदेशातल्या बोलींवर जाणवते.
बंगाली लिपी देवनागरी लिपीपेक्षा थोडी वेगळी आहे पण दोघांमध्ये बरेच साम्य आहे. हिंदीप्रमाणे, त्यातही १४ स्वर आणि ३३ व्यंजने आहेत. बंगालीमध्ये "व" चा उच्चार सहसा "ब" (कधीकधी "उ" किंवा "भा" सारखा) सारखा केला जातो आणि आत्मा, लक्ष्मी, महाशय इत्यादी शब्दांचा उच्चार अत्तान, लोक्खी, मोशाई सारखा केला जातो.[२] बंगालीमध्ये "ओ(O)" चा उच्चार सहसा "अ (A)" जसे कोलकाता - कलकत्ता
मुख्य लेख: बंगाली व्याकरण
बंगाली संज्ञांना लिंग दिली जात नाही, ते विशेषतः विशेषण बदलते. तथापि, संज्ञा आणि सर्वनामांची मोजमाप कमी केली जाते. (वाक्यात त्यांच्या कार्यानुसार बदललेले) चार क्रियांमध्ये बदलते, क्रियापद मोठ्या प्रमाणावर जुळतात आणि क्रियापद नावाच्या लिंगनुसार क्रिया बदलत नाहीत.
बंगाली भाषेतील खालील नमुना मजकूर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार घोषणापत्राचे पहिले कलम आहे.
Article 1: All human beings are born free and equal in dignity and rights. They are endowed with reason and conscience. Therefore, they should act towards one another in a spirit of brotherhood.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.