Remove ads
हिंदू पौराणिक दैवत संकल्पना From Wikipedia, the free encyclopedia
अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव पृथ्वीवर एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा मनुष्यरूपात जन्म घेतात.
डार्विनचा उत्क्रांतिवाद : विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासारखे आहे. पूर्णपणे सुधारलेला माणूस उत्क्रांत होण्याआधी जलचर प्राणी, उभयचर प्राणी, हिंस्र प्राणी व रानटी माणूस हे पृथ्वीवर आले. विष्णूचे अवतार तसेच आहेत. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूलही अशाच अवस्थांमधून जाते. डार्विनच्या समकालीन असलेल्या अर्न्स्ट हेकल (१८३४-१९१९) या प्राणिशास्त्रज्ञाने 'ओंटोजेनी रीकॅपिच्युलेट्स फायलोजेनी' नावाचा सिद्धान्त प्रस्तुत केला होता. त्या सिद्धान्तानुसार मादीच्या गर्भात असलेला भ्रूण उत्क्रांतिवादात सांगितलेल्या पायऱ्या-पायऱ्यांनी वाढतो. हा सिद्धान्त मांडण्यासाठी अर्न्स्टने अनेक जीवांच्या गर्भावस्थेतील छायाचित्रे सादर केली होती. दुर्दैवाने काहीतरी गफलत होऊन कुत्रा, कोंबडा व माणूस यांच्या गर्भावस्था दाखवताना एकच चित्र तीनदा छापले गेले. या सिद्धान्ताचा शोधनिबंध वाचताना या चुका टीकाकारांच्या लक्षात आल्या, आणि सिद्धान्तावर 'चुकीचा सिद्धान्त' असा शिक्का बसला. अशा प्रकारे एक महान वैज्ञानिक सार्वत्रिक लोकसन्मानाला अपात्र ठरला. अर्न्स्ट हेकलने तयार केलेले इकाॅलाॅजी, फायलोजेनी हे शब्द मात्र भाषेत प्रचलित झाले. अर्न्स्टने 'प्रोटिस्टा' नावाचा एक सजीवांचा गटही शोधला होता.
भागवत पुराणात वैकल्पिक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यात त्या अध्याय १.३ मध्ये २२ विष्णू अवतारांची संख्यात्मक यादी केली आहे.
हयग्रीव, हंस आणि गरुड सारख्या अवतारांचा उल्लेखही पंचरात्रमध्ये एकूण एकोणतीस अवतार आहे. तथापि, या याद्या असूनही, साधारणतः विष्णूसाठी स्वीकारलेल्या दहा अवतारांची संख्या १० व्या शतकापूर्वी निश्चित केली गेली होती.[१]
अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.
श्रीदेवी आणि भूदेवी हे लक्ष्मी देवीचे दोन भिन्न अवतार आहेत. रामाची पत्नी सीता; राजकुमार सिद्धार्थाची (गौतम बुद्ध) पत्नी राजकुमारी यशोधरा , कल्की अवतार ची पत्नी पद्मा , कृष्णाची पत्नी रुक्मिणी आणि परशुरामाची पत्नी म्हणून धरिणी हे सर्व लक्ष्मीचे पूर्ण अवतार मानले जाते. दुसरीकडे,कृष्णाची राधा आणि अष्टभार्यापैकी सत्यभामा या लक्ष्मीचे अंश मानल्या जातात.[१]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.