मेहेर बाबा

From Wikipedia, the free encyclopedia

मेहेर बाबा

मेहेर बाबा (जन्म : २५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. सन १९५४मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.

जलद तथ्य
मेहेर बाबा
Thumb
मेहेर बाबा
पूर्ण नावमेरवान शेरिआर इराणी
जन्म२५ फेब्रुवारी १८९४
पुणे, भारत
मृत्यू३१ जानेवारी १९६९
मेहरजाबाद, नगर तालुका, अहिल्यानगर जिल्हा
कार्यक्षेत्रधार्मिक
राष्ट्रीयत्वभारतीय
प्रभावसाईबाबा, उपासनी महाराज
वडीलशेरिआर मुंदेगार इरानी
आईशिरीन
बंद करा

बालपणात त्यांच्यामध्ये ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रूपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.[][] पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले.[] नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ 'दयाळू पिता' असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले.[]

१० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये केली. मेहेरबाबा १९२५ पासून ते मृत्यू पावेतो काहीही बोलले नाहीत.

Thumb
मेहेर बाबा यांचे पुण्यातील निवासस्थान

संदर्भ व नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.