शरभ
From Wikipedia, the free encyclopedia
शरभ हा हिंदू पुराणांमध्ये वर्णिलेला, अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. संस्कृत साहित्यातल्या वर्णनांनुसार आठ पाय असणारा हा प्राणी हत्ती व सिंह यांपेक्षा सामर्थ्यवान असून सिंहास मारू शकतो.

शैव ग्रंथांनुसार विष्णूच्या उग्र नृसिंहावतारास काबूत आणण्यासाठी व त्याला नृसिंहावतारातून मूळ सौम्य रूपात परत आणण्यासाठी शंकराने शरभाचा अवतार घेतला. शंकराचा हा अवतार शरभेश्वर अथवा शरभेश्वरमूर्ती या नावाने उल्लेखला जातो. बौद्ध जातककथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पूर्वावतारांपैकी एक आहे.
सांस्कृतिक संदर्भ
प्रतीक म्हणून

भारतातील कर्नाटक राज्याच्या राजचिन्हात शरभाची आकृती आढळते. या राज्यचिन्हात मध्यभागी गंडभेरुंड (दोन तोंडांचा एक मिथक् पक्षी) असून त्याच्या दोन बाजूंना तांबडी आयाळ असलेले दोन शरभ उभे आहेत. या चिन्हातील विशेष गोष्ट अशी, की यातल्या शरभांचे रूप अंशतः सिंहाचे व अंशतः हत्तीचे दिसते.
महाराष्ट्रातील शरभ चिन्हे
शरभ हे यादवकालीन चिन्ह असल्याने ते महाराष्ट्रातही अनेक ऐतिहासिक इमारतींवर दिसते. उदा० विचित्रगड नावाच्या किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी तर दुसऱ्या दरवाज्यावर दोन्ही बाजूंस दोन सिंह आणि शरभ कोरलेले आहेत. (तिसऱ्या दरवाज्याच्या माथ्यावर हत्ती कोरले आहेत.)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.