माहूर तालुका
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका From Wikipedia, the free encyclopedia
माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. सम्राट प्रसेनजित राजकन्या देवी रेणुका माता मंदिर देवस्थान माहूर जन्मस्थान माहूर हिंदू तीर्थक्षेत्र येथे आहे. आजचा छत्तीसगढ राज्य म्हणजेच पुर्वीचा कुब्ज देशाचा सम्राट प्रसेनजित राजाची राजकन्या रेणुकादेवी आहे. तर जावई रेणुकापती ऋषी जमदग्नी आहेत. प्राचीन छत्तीसगढ (कुब्ज देश) चा राजा सम्राट प्रसेनजित होय.
?माहूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: माहूरगढ़ | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | किनवट |
जिल्हा | नांदेड |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | हिंगोली |
तहसील | माहूर |
पंचायत समिती | माहूर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१७२१ • +०२४६२ • MH26 |
दत्तात्रेय ऋषी |
माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील माहूर पीठाची देवता सम्राट प्रसेनजित राजकन्या माता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी सोबतच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक रामगड (माहूर) किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात.
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत.
प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांची राजकन्या देवी रेणुका मातेचे भव्य दिव्य मंदिर उंच डोंगरावर दाट जंगलात आहे.
एका कथेनुसार, रेणुकादेवीने कुब्ज (छत्तीसगढ राज्य) देशाच्या सम्राट प्रसेनजित राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणुकादेवी असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व 'इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर' असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दुःखी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. 'तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस.' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला 'मातापूर' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात 'ऊर' म्हणजे गाव ते 'माऊर' जे पुढे माहूर झाले. तसेच कालांतराने माहूरला (मा=मायेच,(आई) हूर:-हृदय) "आईचे हृदय" असलेले ठिकाण म्हणजे माहूर असे संबोधले जाऊ लागले.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुका देवी माता होय. परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील विविध जातीतील लोकांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हणले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
वैदिक काळातील इ.स.पु. ५०० मध्ये उत्तर भारतात सम्राट प्रसेनजित महाराजांचे साम्राज्य हे छत्तीसगड , मध्यप्रदेश, मराठवाडा, व उत्तर महाराष्ट्र या परिसरात पसरले होते. राजा प्रसेनजित महाराजांची कन्या रेणुकादेवी होती.
पुराणात हे दत्तांचे शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेच दत्त साक्षात्कार झाला. चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका, महार सत्यवंती ही महार जातीच्या संरक्षणासाठी येथे सती गेली असे पुराणात म्हणले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत १३व्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णूदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी १२ वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांचा नातू तसेच राजकन्या रेणुकादेवी मातेचे ज्येष्ठ सुपुत्र धर्मरक्षक परशुराम हे आहेत. ज्यांचं मंदीर या ठिकाणी आहेत.
(BDO) पंचायत समिती कार्यालय माहूर हे असतात.
(Dy.SP) माहूरगढ़ उपविभाग, माहूर हे असतात.
गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे. त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे.
माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X १२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे.
माळवातीर्थ म्हणून ओळखले जाणारे तीर्थ म्हणजे महानुभावी साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.
श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.