![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/ab/N594JB_Airbus_A320_JetBlue_%25287443348904%2529.jpg/640px-N594JB_Airbus_A320_JetBlue_%25287443348904%2529.jpg&w=640&q=50)
जेटब्ल्यू
From Wikipedia, the free encyclopedia
जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे.
![]() | ||||
| ||||
स्थापना | ऑगस्ट १९९८ | |||
---|---|---|---|---|
हब | जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (न्यू यॉर्क शहर) | |||
मुख्य शहरे |
फोर्ट लॉडरडेल लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ लॉंग बीच सान हुआन ऑरलॅंडो | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | ट्रूब्ल्यू | |||
विमान संख्या | २०७ | |||
गंतव्यस्थाने | ८७ | |||
ब्रीदवाक्य | You Above All | |||
पालक कंपनी |
जेटब्ल्यू एरवेझ कॉर्पोरेशन लुफ्तान्सा समूह (१५.८५%) | |||
मुख्यालय | क्वीन्स, न्यू यॉर्क | |||
संकेतस्थळ | https://www.jetblue.com/ |
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/ab/N594JB_Airbus_A320_JetBlue_%287443348904%29.jpg/640px-N594JB_Airbus_A320_JetBlue_%287443348904%29.jpg)
जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते.
जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.[1]
मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत.