![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/16/Logan_Airport_aerial_view.jpg/640px-Logan_Airport_aerial_view.jpg&w=640&q=50)
लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[3] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.
बॉस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ Boston Logan International Airport | |||
---|---|---|---|
![]() | |||
आहसंवि: BOS – आप्रविको: KBOS – एफएए स्थळसंकेत: BOS – WMO: 72509 | |||
नकाशाs | |||
![]() विमानतळाचे रेखाचित्र | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | मॅसेच्युसेट्स पोर्ट ऑथोरिटी (मासपोर्ट) | ||
कोण्या शहरास सेवा | बॉस्टन | ||
स्थळ | ईस्ट बॉस्टन | ||
हब |
| ||
समुद्रसपाटीपासून उंची | २० फू / ६ मी | ||
संकेतस्थळ | मासपोर्ट.कॉम | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
4L/22R | ७,८६१ | २,३९६ | डांबरी |
4R/22L | १०,००५ | ३,०५० | डांबरी |
9/27 | ७,००० | २,१३४ | डांबरी |
14/32 | ५,००० | १,५२४ | डांबरी |
15L/33R | २,५५७ | ७७९ | डांबरी |
15R/33L | १०,०८३ | ३,०७३ | डांबरी |
सांख्यिकी (२०१२) | |||
विमान आवागमन | ३,५४,८६९ | ||
प्रवासी | २,९३,२५,६१७ | ||
स्रोत: एफ.ए.ए.,[1] Massport.[2] |
लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[4] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[5]
हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.