लुफ्तान्सा
From Wikipedia, the free encyclopedia
दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते.[1] लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.[2]
| ||||
स्थापना | १९२६, १९५४मध्ये पुनर्स्थापना | |||
---|---|---|---|---|
हब |
फ्रांकफुर्ट विमानतळ म्युनिक विमानतळ | |||
मुख्य शहरे | बर्लिन, हांबुर्ग, मिलान, श्टुटगार्ट | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | माइल्स अँड मोअर | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
उपकंपन्या |
| |||
विमान संख्या | ६६७ | |||
गंतव्यस्थाने | २१५ | |||
ब्रीदवाक्य | Nonstop you | |||
मुख्यालय | क्योल्न | |||
प्रमुख व्यक्ती | कार्श्टेन स्फोर | |||
संकेतस्थळ | http://www.lufthansa.com |
लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे.[1][3][4][5] लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत.[6] लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).
लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे.