डॉ स्वरूप रावल (पूर्वाश्रमीच्या स्वरूप संपत), (३ नोव्हेंबर १९५८) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत. त्या ८० च्या दशकातील 'नरम गरम' आणि 'नाखुदा' सारख्या हिंदी चित्रपटांमधील भूमिका तसेच 'ये जो है जिंदगी' सारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात.[2] त्यांनी इस १९७९ मधील 'भारत सुंदरी' (मिस इंडिया)चा पुरस्कार जिंकला होता. तसेच त्याच साली विश्व सुंदरी (मिस युनिव्हर्स) स्पर्धेत मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते.[3][4]

जलद तथ्य स्वरूप संपत रावळ, जन्म ...
स्वरूप संपत रावळ
Thumb
स्वरूप संपत (२०१४)
जन्म स्वरूप परेश रावळ
३ नोव्हेंबर, १९५८ (1958-11-03) (वय: ६५)
गुजरात
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय , मॉडेलिंग , चित्रपट निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८० ते आजतागायत
भाषा गुजराती
प्रमुख टीव्ही कार्यक्रम ये जो है जिंदगी
पुरस्कार फेमिना मिस इंडिया - १९७९
पती [1]
अपत्ये अनिरुद्ध, आदित्य
धर्म हिंदू
बंद करा

वैयक्तिक आयुष्य

स्वरूप संपत ने अभिनेता परेश रावळसोबत इ.स. १९८७ साली लग्न केले.[1] ती तिच्या पती अभिनीत नाटकांचे दिग्दर्शन आणि अभिनय करते. त्यांना अनिरुद्ध आणि आदित्य अशी दोन मुले आहेत

Thumb
परेश रावल आणि स्वरूप संपत 'ओये लकी! लकी ओये!' चित्रपटाच्या वेळी

स्वरूप संपत यांनी वूस्टर विद्यापीठ येथून पीएचडी मिळवली आहे.[5][6] नाटकाचा वापर करून अपंगत्व असलेल्या मुलांचे जीवन कौशल्य कसे वाढवता येईल यावर प्रबंध सादर केला (डॉक्टरेट).[7]

अभिनयाची कारकीर्द

स्वरूप संपत यांनी ८० च्या दशकातील दूरदर्शन वरील प्रचंड लोकप्रिय मालिका 'ये जो है जिंदगी' मध्ये मुख्य भूमिका साकारली. यात त्यांनी शफी इनामदारच्या रेणू नावाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांना ये जो है जिंदगीची स्क्रिप्ट खूपच हृदयस्पर्शी वाटली होती आणि त्यांची अशी खात्री होती की ही भूमिका सामान्य लोकांशी चांगली जोडलेली आहे आणि त्यांच्या दैनंदिन क्रियाकलाप आणि साधेपणाने जीवन जगते. आणि केवळ यासाठी त्यांनी दूरदर्शन वरील दुसरी एक महत्त्वाची मालिका नाकारली होती. आज त्यांना हा निर्णय घेतल्याचे सार्थक वाटते. त्यावेळी कमल हासन - रीना रॉय यांच्या भूमिका असलेला चित्रपट 'करिश्मा' मध्ये देखील दिसल्या होत्या.

संपत यांनी 'शिंगार' या कुमकुम कंपनीसाठी मॉडेलिंग केले होते.

त्या आजच्या काळात अपंग मुलांना अभिनय शिकवतात. तसेच आपल्या प्रबंध शोधाचा सदुपयोग करून घेण्यासाठी त्या भारतभर प्रवास करतात आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करतात.[7]

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी संपत यांची निवड केली होती.[8]

जगभरातील १७९ देशांतील १०,००० नामांकनांमध्ये, वार्की फाउंडेशनने आयोजित केलेल्या ग्लोबल टीचर बक्षीससाठी तिला टॉप-१० ग्लोबल फायनलिस्टमध्ये निवडण्यात आले होते.[9]

अभिनय सूची

दूरचित्रवाहिनी

अधिक माहिती वर्ष, मालिका ...
वर्षमालिकाभूमिका
1984ये जो है जिंदगीरेणू
1990ये दुनियां गजब की
1990ऑल द बेस्ट
1990बीवी तो बिवी साला रे सालालक्ष्मी
1990शांती
बंद करा

चित्रपट

अधिक माहिती वर्ष, चित्रपट ...
वर्षचित्रपटभूमिका
2021द व्हाईट टायगरसमाजसेविका
2019उरी: सर्जिकल स्ट्राइकसुहाशिनी शेरगिल
2016की अँड काकि आची आई
2013सप्तपदीस्वाती संघवी
2002साथियाशांती
1986कर्मदातानीता
1985जान की बाज़ी
1985बहु की आवाजकविता
1984करिश्मासपना
1984लोरीसुमन
1983हिम्मतवालापद्मा
1982तुम्हारे बिनासीमा दत्त
1982सवालरेशमी सिंग
1981नाखुदासोनिया गुप्ता
1981नरम गरमकुसुम
बंद करा

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.