सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार)
From Wikipedia, the free encyclopedia
सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र इत्यादी संकल्पनांची 'सार्वजनिक दृश्यमान' या सोबत गल्लत होताना दिसते, कायद्याच्या चष्म्यातून पाहताना यातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. कायद्यांच्या दृष्टीकोणातून सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक असेल, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल, सार्वजनिक अधिक्षेत्रात असेल असे नाही.
![]() |
सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार) हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ विश्वकोशीय लेख आहे,यात फारच सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, ती माहिती, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर, असा सल्ला आपण कृपया योग्य अशा परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही.येथे व अशा प्रकारच्या लेखात, सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार या बाबी लागू होत आहेत.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.) हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. |
सार्वजनिक म्हणजे सर्वांना माहित झालेले अथवा असलेले, सर्वांच्या मालकीचे, सर्वांना वापरता येण्या जोगे अथवा सरकारी मालकीचे म्हणून सार्वजनिक मालकीचे या पैकी कोणताही एक अर्थ असू शकतो.
'सार्वजनिक दृश्यमान' असलेली गोष्ट सार्वजनिक नसून 'खासगी' असू शकते, खासगी गोष्टीना 'सार्वजनिक दृश्यमानता' असली तरी त्यास सार्वजनिक उपलब्धता म्हणजे वापरण्याचा अधिकार नसेल अथवा मर्यादीत असू शकेल. किंवा सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र या पैकी एक किंवा अधिक मधीलही अशू शकेल.
सार्वजनिक उपलब्ध मध्ये सर्वसाधारणत: एखादी गोष्ट सार्वजनिक मालकीची असो अथवा नसो, सर्वसाधारणपणे ठरावीक अटींवर जसे कि मुल्य देऊन अथवा मोफत, कायद्यांच्या अधीन राहून त्या अटींमध्ये बसणाऱ्या कुणासही 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध' गोष्ट वापरता यावयास हवी. परंतु 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध' या संकल्पनेची 'सार्वजनिक दृश्यमान' संकल्पनेशी गल्लत केली जाताना दिसते कि ज्यामुळे वापरास अनुमती नसलेल्या गोष्टीचा (अनधिकृत) वापर होताना दिसून येऊ शकतो. सार्वजनिक अधिक्षेत्र या शब्दातील सार्वजनिक शब्दात सरकारी मालकी हा अर्थ नसेल तर अशी गोष्ट (कायद्यांच्या अधीन राहून) सर्वांना वापरण्यास मुक्तपणे उपलब्ध असते. म्हणजेच 'सार्वजनिक उपलब्ध' मध्ये तीन प्रकार असू शकतात, पहिला सार्वजनिक अधिक्षेत्रातील मुक्तपणे वापरास अनुमती असलेला, दुसरा विशिष्ट अटींवर सार्वजनिक वापरास अनुमती असलेला, तिसरा अनधिकृत म्हणजे 'सार्वजनिक दृश्यमान' या संकल्पनेशी गल्लत झाल्यामुळे वापरास अनुमती नसतानाही वापरला जात असणारा.[1]
उपरोक्त विश्लेषण विविध कायद्यांच्या दृष्टीने विचारात घेता येऊ शकते जसे की कॉपीराईट कायदा.