विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
From Wikipedia, the free encyclopedia
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
आपण मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय संकेतस्थळाच्या उत्तरदायकत्वास नकार (disclaimer) नावाच्या सर्वसाधारण विभागात पोहोचला आहात. मराठी विकिपीडियातील कोणताही लेख किंवा पान महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीचे/संस्थेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही संस्थेची वा व्यक्तीची समस्या, तक्रार, किंवा शंका निवारण करणारे केंद्र/पान या संकेतस्थळावर -(वेब साइटवर)- उपलब्ध नाही .धन्यवाद!
- पहा विकिपीडिया परिचय
विकिपीडिया हा आंतरजालावरील (ऑनलाइन) मुक्तपणे मजकूर लिहिणार्या सहयोगी लोकांचा विश्वकोश (ज्ञानकोश/एनसायक्लोपीडिया) आहे. म्हणजे थोडक्यात, विकिपीडिया हे मानवी ज्ञानाच्या सामाईक स्रोतांवर[श 1] काम करणार्या स्वयंसेवी व्यक्तींचे व स्वयंसेवी गटांचे एक स्वयंस्फूर्त संघटन आहे. संगणक वापरणार्या व आंतरजाल जोडणी [श 2] उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण [श 3] झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.
याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.
तरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही. कोणत्याही लेखातील कोणताही मजकूर खर्याखुर्या जाणकार व्यक्तीच्या मतांशी न जुळणार्या किंवा संबंधित क्षेत्रातील ज्ञानाच्या अद्ययावत स्थितीबद्दल[श 4] काहीच माहिती नसलेल्या व्यक्तीकडून पूर्ण अथवा अंशतः बदललेला किंवा विध्वंसित/उत्पातित झालेला असू शकतो. येथे हे लक्षात घ्या की, इतरही बहुतेक सर्व विश्वकोशांमध्ये (एनसायक्लोपीडियाज) आणि संदर्भ ग्रंथांमध्येसुद्धा अशाच प्रकारचे सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार अंतर्भूत असतात.