मायक्रोसॉफ्ट विंडोज
विकिपीडिया वर्ग / From Wikipedia, the free encyclopedia
मायक्रोसॉफ्ट विंडोज (इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल (आलेखी) सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर, इ.स. १९८५ रोजी विंडोज नामक संचालन पर्यावरण आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे [1]. ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वद टक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे. खासगी संगणकासाठी (पर्सनल कॉम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटू व मोबाईल फोनसाठी विंडोज फोन ८ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत.
प्रारंभिक आवृत्ती | नोव्हेंबर २०, १९८५ (विंडोज १.०) |
---|---|
सद्य आवृत्ती |
विंडोज ८, विंडोज सर्व्हर २०१२ एनटी ६.२ बिल्ड ९२०० (ऑक्टोबर २६, इ.स. २०१२) |
विकासाची स्थिती | सद्य |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी, सी++, असेंब्ली |
प्लॅटफॉर्म | x८६ |
भाषा | अनेक (विंडोज ७ च्या भाषा) |
सॉफ्टवेअरचा प्रकार | संगणक संचालन प्रणाली |
सॉफ्टवेअर परवाना | प्रताधिकारित |
संकेतस्थळ | मायक्रोसॉफ्ट.कॉम |
मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) होय. GUI म्हणजे चित्रमय दृश्यरुप. यावर आधारित सर्व प्रोग्राम चित्रमय असतात. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टिम सोपी (युजर फ्रेंडली) वाटते. मॉनिटरवर दिसणान्या छोट्या चित्रांच्या सहाय्याने संगणकास सूचना देता येतात. विंडोजमध्ये मेमरीचे व्यवस्थापन अधिक चांगले आहे. यात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयाच्या दोन किंवा जास्त प्रोग्रामवर काम करता येते, एकाच वेळी पत्र लिहिणे, स्प्रेडशीट तयार करणे, किंवा गेम्स खेळणे अशी विविध कामे करता येतात. यासाठी आवश्यक ते प्रोग्राम उघडून ठेवले की एका प्रोग्राममधून दुस-या प्रोग्राम विंडोमध्ये सहज प्रवेश करता येतो. विंडोजवर आधारित वेगवेगळ्या कामांसाठी तयार केलेले सर्व प्रोग्राम्स बरेचसे सारखे असतात. त्यामळे हे प्रोग्राम शिकणे सोपे जाते. प्रोग्राम्स नियमबद्ध व एकमेकांशी संलग्न असतात. त्यामुळे डेटाची देवाणघेवाण सोपी जाते.