रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात.

जलद तथ्य व्यक्तिगत माहिती, आंतरराष्ट्रीय माहिती ...
रिकी पॉंटिंग
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रिकी थॉमस पॉंटिंग
उपाख्य पंटर
जन्म १९ डिसेंबर, १९७४ (1974-12-19) (वय: ४९)
लॉन्सेस्टन, टास्मानिया,ऑस्ट्रेलिया
उंची  फु १० इं (१.७८ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. १४
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९३ - टास्मानियन टायगर्स
२००४ सॉमरसेट
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ११० २८५ २०६ ३५२
धावा ९,३६८ १०,५९४ १७,९७० १२,७७२
फलंदाजीची सरासरी ५९.२९ ४३.४१ ६०.५० ४२.७१
शतके/अर्धशतके ३३/३६ २३/६३ ६७/७२ २६/७८
सर्वोच्च धावसंख्या २५७ १६४ २५७ १६४
चेंडू ५२७ १५० १,४२२ ३४९
बळी १४
गोलंदाजीची सरासरी ४६.२० ३४.६६ ५४.०७ ३३.६२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/० १/१२ २/१० ३/३४
झेल/यष्टीचीत १२४/– १२७/– २०९/– १५८/–

१ नोव्हेंबर, इ.स. २००७
दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर)

बंद करा

२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली.

अधिक माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.