भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील चलचित्रपट विषयक तरतुदी
From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये चलचित्रपट हे एक काम आहे (२(y)), या कायद्यातील व्याख्येनुसार, "चलचित्रपट म्हणजे दृक मुद्रणाचे कोणतेही काम आणि अशा दृकमुद्रणासोबत ध्वनीमुद्रणाचा समावेश असेल आणि कोणत्याही समकक्ष प्रक्रीयेने निर्मित कोणतेही काम ज्यात व्हिडीओ पटाचाही समावेश असेल तेही चलचित्रपट समजले जाईल."(2(f)) चलचित्रपट कामाच्या निर्मितीसाठी पुढाकार आणि जबाबदारी घेणारी व्यक्ती निर्माता म्हणवली जाते.(२ (uu)), चलचित्रपटाचा निर्माता ह्या कायद्यासाठी लेखक म्हणवला जातो (२(d)(v)), सहसा हा लेखकच (म्हणजे प्रत्यक्षात चलचित्रपटाचा निर्माता) हाच चलचित्रपटाचा पहिला मालक म्हणवला जातो (१७), परंतु (इतर विशेष कराराचा अभाव असेल तर) (शासननियंत्रीत/नियुक्त) सार्वजनिक उपक्रम अथवा शासनाने बनवुन घेतलेल्या चलचित्रपटांचे पहिले मालक तेच ठरतात,(१७(d)आणि(dd)) किंवा (इतर विशेष कराराचा अभाव असेल तर) शिकाऊ उमेदवारी आणि सेवा करारांतर्गतची नौकरी दरम्यान निर्मीत(१७ (c)) अथवा वृत्तसंस्थेतील नौकरी दरम्यान वृत्तसंस्थेतील प्रकाशनासाठी(१७ (a)) केलेल्या चलचित्रपटाची पहिली मालक संबंधीत संस्था असते, आणि एखाद्या व्यक्तीने पैसे देऊन चलचित्रपट निर्मिती करवून घेतल्यास पहिली मालक पैसे देऊन बनवून घेणारी व्यक्ती ठरते.(१७ b).
![]() |
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील चलचित्रपट विषयक तरतुदी हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ विश्वकोशीय लेख आहे,यात फारच सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, ती माहिती, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर, असा सल्ला आपण कृपया योग्य अशा परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही.येथे व अशा प्रकारच्या लेखात, सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार या बाबी लागू होत आहेत.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.) हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. |
चलचित्रपटाचा महत्त्वपुर्णभाग दुसऱ्या कोणत्याही कामाचे प्रताधिकार उल्लंघन(51Explanation) असल्यास त्यात प्रताधिकार विद्यमान होऊ शकत नाही (13(3)) , अन्यथा चलचित्रपटासाठी संपूर्ण भारतात प्रताधिकार विद्यमान राहतो.(१३(1)(b)) चलचित्रपटातील प्रताधिकार विद्यमानतेचा कालावधी, चलचित्रपट प्रकाशित झालेले कॅलेंडरवर्ष अधिक साठवर्षे एवढा असतो.(२६) भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १४ (a) प्रताधिकार विद्यमान असलेल्या कामांसाठी लेखकास (या कायद्यातील व्याख्येनुसार चलचित्रपट निर्मात्यास) काही विशेषाधिकार प्रदान करते.(१४ (a)) तर कलम १४ (d) (i) अन्वये चलचित्रपटास इलेक्ट्रॉनीक अथवा इतर माध्यमातून जतन करण्याचे (१४(d)(i)(B)), चलचित्रपटाच्या कोणत्याही भागाच्या प्रतिमेपासून छायाचित्र बनवण्यासहीत(१४(d)(i)(A), चलचित्रपटाची प्रत बनवण्याचे विशेषाधिकार चलचित्रपट निर्मात्याकडे असतात.(१४ (d) (i))
- 4[(f) "cinematograph film" means any work of visual recording [***][6thAmnd 1] and, includes a sound recording accompanying such visual recording and "cinematograph" shall be construed as including any work produced by any process analogous to cinematography including video films;]
- omitted "on any medium produced through a process from which a moving image may be produced by any means" by Act 27 of 2012, w.e.f. 8th June, 2012