बामियान प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
बामियान प्रांत तथा बाम्यान प्रांत (दारी/पश्तो:ولایت بامیان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ८ जिल्हे असून येथील लोकसंख्या ४,९५,५५७ आहे.[1] यांतील बव्हंश हजारा असून काही प्रमाणात ताजिक लोकही येथे राहतात. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र बामियान आहे.
सातव्या शतकात येथे बांधलेले बुद्धाचे प्रचंड पुतळे तालिबानने २००१मध्ये भग्न केले.