परांडा विधानसभा मतदारसंघ
हा महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
परांडा विधानसभा मतदारसंघ - २४३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परांडा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यांचा समावेश होतो. परांडा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
शिवसेनेचे तानाजी जयवंत सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]