परभणी विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
परभणी विधानसभा मतदारसंघ - ९६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी, पिंगाळी, परभणी ही महसूल मंडळे आणि परभणी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]