नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ
From Wikipedia, the free encyclopedia
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ - ८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदेड उत्तर मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, लिंबगांव ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते ९, २८ ते ३९, ५० ते ५८ यांचा समावेश होतो. नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
शिवसेना पक्षाचे बालाजी देविदासराव कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]