तिवसा विधानसभा मतदारसंघ
From Wikipedia, the free encyclopedia
तिवसा विधानसभा मतदारसंघ - ३९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तिवसा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका, मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, धामणगांव ही महसूल मंडळे, अमरावती तालुक्यातील शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव ही महसूल मंडळे आणि भातकुली तालुक्यातील आष्टी, खोलापूर ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. तिवसा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[2]