तंत्र
From Wikipedia, the free encyclopedia
तंत्र, तंत्रशास्त्र वा तंत्रमार्ग या संज्ञेने भारतीय मूळ असलेल्या एका गूढ, बहुआयामी आणि व्यामिश्र परंपरेचा निर्देश केला जातो. काही धार्मिक मान्यतांनुसार तंत्रमार्ग हे सुमारे ७००० वर्षांपूर्वी भारतात प्रथम शिकविले गेलेले आध्यात्मिक शास्त्र होते. व्युत्पत्तीनुसार ‘तन्’ म्हणजे ‘विस्तार’ आणि ‘त्र’ या अक्षराने मुक्तीचा निर्देश केला जातो. तेव्हा तंत्र हा असा मार्ग आहे ज्यामुळे मानवी मनाचा विस्तार होतो आणि मानव अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे, बंधनातून मुक्तीकडे जातो. [1]
पूर्ण बहरास आलेली हिंदू धर्मामधील व बौद्ध धर्मामधील चळवळ वा सांस्कृतिक शैली म्हणून तंत्रमार्ग इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या मध्यास आढळून येतो आणि इस १००० च्या सुमारास अभिनव गुप्ताच्या काळात तिचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो असे जॉर्ज फ्युअरस्टाईनचे मत आहे. [2]