![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0c/A_family_at_a_temple%252C_Buddhist_culture_religion_rites_rituals_sights.jpg/640px-A_family_at_a_temple%252C_Buddhist_culture_religion_rites_rituals_sights.jpg&w=640&q=50)
बौद्ध
From Wikipedia, the free encyclopedia
बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे गुरू आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.[1][2][3] बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0c/A_family_at_a_temple%2C_Buddhist_culture_religion_rites_rituals_sights.jpg/640px-A_family_at_a_temple%2C_Buddhist_culture_religion_rites_rituals_sights.jpg)