जिंतूर विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
जिंतूर विधानसभा मतदारसंघ - ९५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सैलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
भारतीय जनता पक्षाच्या मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर ह्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[3]