क्वांटास
From Wikipedia, the free encyclopedia
क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे.[1][2] क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
जलद तथ्य आय.ए.टी.ए. QF, आय.सी.ए.ओ. QFA ...
| ||||
स्थापना | १६ नोव्हेंबर १९२० | |||
---|---|---|---|---|
हब |
मेलबर्न विमानतळ (मेलबर्न) सिडनी विमानतळ (सिडनी) ब्रिस्बेन ॲडलेड पर्थ दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (दुबई) | |||
मुख्य शहरे |
केर्न्स लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (लॉस एंजेल्स) | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
उपकंपन्या | जेटस्टार एअरवेज | |||
विमान संख्या | १३१ | |||
ब्रीदवाक्य | The Spirit of Australia | |||
मुख्यालय | सिडनी, न्यू साउथ वेल्स | |||
संकेतस्थळ | qantas.com.au |
बंद करा
२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे.