क्लीव्हलंड (इंग्लिश: Cleveland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कोलंबसखालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात ईरी सरोवराच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या मिड-वेस्ट ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.[1]

जलद तथ्य
क्लीव्हलंड
Cleveland
अमेरिकामधील शहर

Thumb

Thumb
ध्वज
Thumb
क्लीव्हलंड
क्लीव्हलंड
क्लीव्हलंडचे ओहायोमधील स्थान
Thumb
क्लीव्हलंड
क्लीव्हलंड
क्लीव्हलंडचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°28′56″N 81°40′11″W

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८१४
क्षेत्रफळ २१३.४ चौ. किमी (८२.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६५३ फूट (१९९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,९६,८१५
  - घनता १,९७४ /चौ. किमी (५,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.city.cleveland.oh.us
बंद करा

येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. सध्या येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणाऱ्या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.[2]

शहर रचना

Thumb
ईरी सरोवरावरून टिपलेले क्लीव्हलंडचे विस्तृत चित्र

गॅलरी

इतिहास

क्याहोगा नदी आणि ईरी सरोवर यांच्या दरम्यान इ.स. १८३२ मध्ये ईरी कालवा तयार होईपर्यंत क्लीव्हलंड शहराचा विकास मंदगतीनेच होत होता.[3] ईरी कालव्याची निर्मिती इ.स. १८२५ मध्ये चालू झाली होती.

भूगोल

क्लीव्हलंड शहर ईरी सरोवराच्याक्याहोगा नदीच्या काठावर एका उंचसखल भागात वसले आहे.

हवामान

ह्या भागातील इतर शहरांप्रमाणे क्लीव्हलंड शहराचे हवामान उन्हाळ्यांमध्ये उष्ण व दमट तर हिवाळ्यांमध्ये शीत असते. सरोवराच्या काठावर असल्यामुळे येथे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.

अधिक माहिती क्लीव्हलंड (क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ) साठी हवामान तपशील, महिना ...
क्लीव्हलंड (क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 73
(23)
74
(23)
83
(28)
88
(31)
92
(33)
104
(40)
103
(39)
102
(39)
101
(38)
90
(32)
82
(28)
77
(25)
104
(40)
सरासरी कमाल °फॅ (°से) 32.6
(0.3)
35.8
(2.1)
46.1
(7.8)
57.3
(14.1)
68.6
(20.3)
77.4
(25.2)
81.4
(27.4)
79.2
(26.2)
72.3
(22.4)
60.8
(16)
48.7
(9.3)
37.4
(3)
58.1
(14.5)
सरासरी किमान °फॅ (°से) 18.8
(−7.3)
21
(−6)
28.9
(−1.7)
37.9
(3.3)
48.3
(9.1)
57.7
(14.3)
62.3
(16.8)
61.2
(16.2)
54.3
(12.4)
43.7
(6.5)
34.9
(1.6)
24.9
(−3.9)
41.2
(5.1)
विक्रमी किमान °फॅ (°से) −20
(−29)
−16
(−27)
−5
(−21)
10
(−12)
25
(−4)
31
(−1)
41
(5)
38
(3)
32
(0)
19
(−7)
3
(−16)
−15
(−26)
−20
(−29)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.48
(63)
2.29
(58.2)
2.94
(74.7)
3.37
(85.6)
3.50
(88.9)
3.89
(98.8)
3.52
(89.4)
3.69
(93.7)
3.77
(95.8)
2.74
(69.6)
3.38
(85.9)
3.14
(79.8)
38.71
(983.2)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 16.8
(42.7)
14.2
(36.1)
9.8
(24.9)
2.4
(6.1)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
5.1
(13)
12.6
(32)
61.4
(156)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 16.9 13.7 14.7 14.5 12.6 11.2 10.5 10.4 10.3 11.7 14 16.3 156.8
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 13.3 10.0 6.8 2.3 0 0 0 0 0 0.4 4.4 10.6 47.8
स्रोत: NOAA,[4] The Weather Channel [5]
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.