कोलंबस (इंग्लिश: Columbus) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्याची राजधानी, सर्वात मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. सुमारे ८ लाख लोकसंख्येचे कोलंबस हे अमेरिकेमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे व बऱ्याचदा अमेरिकेतील सर्वात मोठे लहान शहर (द बिगेस्ट स्मॉल टाउन इन अमेरिका) ह्या टोपणनावाने ओळखले जाते.[२]
कोलंबस Columbus |
|||
अमेरिकामधील शहर | |||
|
|||
गुणक: 39°49′N 82°59′W |
|||
देश | अमेरिका | ||
राज्य | ओहायो | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८१२ | ||
क्षेत्रफळ | ५५०.५ चौ. किमी (२१२.५ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ९०२ फूट (२७५ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७,८७,०३३[१] | ||
- घनता | १,३७३ /चौ. किमी (३,५६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
www.columbus.gov |
शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, विमानसेवा इत्यादी उद्योग क्षेत्रांमध्ये कोलंबस हे अमेरिकेमधील एक अग्रेसर शहर आहे. अनेक परिक्षणांनुसार कोलंबस हे व्यापाराच्या, निवासाच्या, तंत्रज्ञानाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने कोलंबस हे देशामधील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे.[३][४][५] येथील ओहायो राज्य विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या संखेच्या दृष्टीने अमेरिकेमधील पाच सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.
गॅलरी
- कोलंबस महापालिका भवन
- ओहायो राज्य विधान भवन
- लेव्हेक टॉवर
- ख्रिस्तोफर कोलंबसाच्या सांता मारिया जहाजाची प्रतिकृति
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.