केज विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
केज विधानसभा मतदारसंघ - २३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, केज मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. केज तालुका, २. बीड तालुक्यातील नेकनूर महसूल मंडळ आणि ३. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगांव, अंबाजोगाई ही महसूल मंडळे आणि अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. केज हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[1][2]
भारतीय जनता पक्षाचे नमिता अक्षय मुंदडा हे केज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]