हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia
कळवण विधानसभा मतदारसंघ - ११७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कळवण मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कळवण हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन अर्जुन पवार हे कळवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | नितीन अर्जुन पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | जिवा पांडू गावित | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) | |
२००९ | अर्जुन तुळशीराम पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कळवण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अर्जुन तुळशीराम(ए.टी.) पवार | राष्ट्रवादी | ७४,३८८ |
जिवा पांडू गावित | माकप | ५८,१३५ |
यादव पांडू धूम | शिवसेना | १०,६२८ |
हरीभाऊ काळू पवार | अपक्ष | २,५४१ |
दादाजी म्हाळू आंबेकर | बसपा | १,३३५ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.