एरबस ए३८० हे फ्रान्समधील एरबस ह्या कंपनीने विकसित व उत्पादित केलेले लांब पल्ल्याचे, जगातील सगळ्यात जास्त प्रवासीक्षमता असलेले दोनमजली विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एरबस ए३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एरलाइन्स ह्या कंपनीने २५ ऑक्टोबर २००७ रोजी पुरवली.

जलद तथ्य एरबस ए३८०, प्रकार ...
एरबस ए३८०
Thumb

ए३८० दुबईमध्ये उतरताना

प्रकार लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे चार इंजिनांचे जेट विमान
उत्पादक एरबस
पहिले उड्डाण एप्रिल २७, २००५
समावेश ऑक्टोबर २५, २००७ (सिंगापूर एरलाइन्स)
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता एमिरेट्स, सिंगापूर एरलाइन्स, एर फ्रान्स, क्वांटास, लुफ्तांसा
उत्पादन काळ २००४-सद्य
उत्पादित संख्या १४७ (नोव्हेंबर २०१४)
प्रति एककी किंमत ४१ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर
बंद करा

एरबसने प्रतिस्पर्धी विमान उत्पादक बोइंगचे लांब पल्ल्याच्या विमानांवरील वर्चस्व मोडून काढण्यासाठी जून १९९४ मध्ये ह्या विमानाची घोषणा केली. १९ डिसेंबर २००० रोजी एरबसच्या प्रशासनाने ८.८ अब्ज युरो इतक्या खर्चाचा एरबस ए३८० विमान विकासाचा आराखडा मंजूर केला. २३ जानेवारी २००२ रोजी ह्या विमानाच्या पहिल्या सुट्या भागाचे उत्पादन सुरू झाले. पहिले विमान बांधून पूर्ण होईपर्यंत ह्या पूर्ण परियोजनेचा एकूण खर्च ११ अब्ज युरोंवर पोचला होता. अतिविशाल आकाराच्या ह्या विमानाचे सुटे भाग फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डमस्पेन ह्या देशांमध्ये बनवले जातात व तुलूझमधील प्रमुख कारखान्यामध्ये एकत्र जोडले जातात. ह्या विमानामधील अत्यंत गुंतागुंतीच्या विद्युत जोडण्या करण्यासाठी ५३० किमी लांबीच्या तारा वापरल्या जातात. एरबसने महिन्याला ४ ए३८० विमाने पूर्ण करण्याची क्षमता बनवली आहे.

मागण्या व ग्राहक

नोव्हेंबर २०१४ मध्ये एरबसकडे ए३८० विमानाच्या एकूण ३१८ मागण्या (ऑर्डर्स) होत्या ज्यांपैकी १४७ विमाने ग्राहकांना हास्तांतरीत करण्यात आली आहेत.

अधिक माहिती ग्राहक, वापरास सुरुवात ...
ग्राहक वापरास सुरुवात पक्क्या मागण्या पर्यायी मागण्या सुपूर्ती बातमी
एर ऑस्ट्राल 2
एर फ्रान्स 200912210 [1]
अमेडेओ 2016 20 [2]
एशियाना एरलाइन्स 2014 6 2 [3]
ब्रिटिश एरवेझ 2013 12 7 8 [4]
चायना सदर्न एरलाइन्स 2011 5 5 [5]
एमिरेट्स 2008 140 55 [6]
एतिहाद एरवेझ 2014 10 5 1 [7]
अज्ञात ग्राहक 10
किंग्डम होल्डिंग कंपनी 1
कोरियन एर 2011 10 10 [8]
लुफ्तान्सा 20101412 [9]
मलेशिया एरलाइन्स 2012 6 6 [10]
क्वांटास 2008 20 4 12 [11]
कतार एरवेझ 2014 10 3 2 [12]
सिंगापूर एरलाइन्स 2007 24 1 19 [13]
थाई एरवेझ 2012 6 6 [14]
ट्रान्सएरो एरलाइन्स 2015 4 [15]
व्हर्जिन अटलांटिक 201866 [16][17]
एकूण 318 28 147
बंद करा

चित्रदालन

Thumb
ए३८० विमानासाठी रोल्स-रॉईस कंपनीची ४ इंजिने वापरली जातात.
ए३८० विमानासाठी रोल्स-रॉईस कंपनीची ४ इंजिने वापरली जातात.  
Thumb
पहिले पूर्ण झालेले ए३८०
पहिले पूर्ण झालेले ए३८०  
Thumb
पहिल्या उड्डाणानंतर उतरणारे ए३८०
पहिल्या उड्डाणानंतर उतरणारे ए३८०  
Thumb
ए३८० चे कॉकपिट
ए३८० चे कॉकपिट  
Thumb
इकॉनॉमी क्लास
इकॉनॉमी क्लास  

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.