उमरगा विधानसभा मतदारसंघ
हा महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
उमरगा विधानसभा मतदारसंघ - २४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, उमरगा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उमरगा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[1][2]
शिवसेनेचे ज्ञानराज धोंडिराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]