इटलीची राजधानी आणि सर्वात मोठे शहर From Wikipedia, the free encyclopedia
रोम (इटालियन: Roma) ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.[2]
रोम Roma |
||
इटली देशाची राजधानी | ||
|
||
गुणक: 41°54′N 12°30′E |
||
देश | इटली | |
प्रांत | लात्सियो | |
क्षेत्रफळ | १,२८५ चौ. किमी (४९६ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६६ फूट (२० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २७,४३,७९६ (डिसेंबर २००९)[1] | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.comune.roma.it/ |
इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेर व ऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, इ.स.पूर्व ७५३ रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथेच होती.
दुसऱ्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.[3]
रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, युरोपीय संघामधील ३ रे तर जगातील ११वे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[4] युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे.[5]
लिओनार्डो दा विंची फ्युमिचिनो विमानतळ रोममधील प्रमुख विमानतळ आहे. येथून जगातील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आसपासच्या प्रदेशातील शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय रोम च्यांपिनो हा छोटा विमानतळही शहराला विमानसेवा पुरवतो.
रोमा टर्मिनी हे रोमचे मुख्य रेल्वे स्थानक आहे.
९ एप्रिल, १९५६ पासून रोमने फक्त पॅरिसला जुळ्या शहराचा दर्जा दिला आहे.
रोमची इतर मित्र शहरे:[11]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.