फॉर्म्युला वन हंगाम From Wikipedia, the free encyclopedia
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ डिसेंबर २०१९ रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
२०१९ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: २०१८ | पुढील हंगाम: २०२० |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |
२०१९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
संघ | कारनिर्माता | चेसिस | इंजिन† | चालक क्र. | रेस चालक | शर्यत क्र. | परीक्षण चालक | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अल्फा रोमियो रेसिंग | अल्फा रोमियो रेसिंग स्कुदेरिआ फेरारी | अल्फा रोमियो रेसिंग सि.३८ | फेरारी ०६४ | ७ ९९ |
किमी रायकोन्नेन अँटोनियो गियोविन्झी |
सर्व सर्व | |||
स्कुदेरिआ फेरारी[टीप 1] | स्कुदेरिआ फेरारी | फेरारी एस.एफ.९० | फेरारी ०६४ | ५ १६ |
सेबास्टियान फेटेल चार्ल्स लेक्लर्क |
सर्व सर्व | |||
हास एफ.१ संघ [टीप 2] | हास एफ.१ संघ स्कुदेरिआ फेरारी | हास व्हि.एफ.१९ | फेरारी ०६४ | ८ २० |
रोमन ग्रोस्जीन केविन मॅग्नुसेन |
सर्व सर्व | |||
मॅकलारेन एफ.१ संघ | मॅकलारेन रेनोल्ट एफ१ | मॅकलारेन एम.सी.एल.३४ | रेनोल्ट ई-टेक १९ | ४ ५५ |
लॅन्डो नॉरिस कार्लोस सेनज जुनियर |
सर्व सर्व | |||
मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास मोटरस्पोर्ट | मर्सिडीज बेंझ | मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी एफ.१ डब्ल्यू.१० ई.क्यु पावर+ | मर्सिडीज-बेंझ एम.१० ई.क्यु पावर+ | ४४ ७७ |
लुइस हॅमिल्टन वालट्टेरी बोट्टास |
सर्व सर्व | |||
स्पोर्टपिसा रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ | रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ बि.डब्ल्यु.टी. ए.जी मर्सिडीज बेंझ | रेसींग पॉइन्ट आर.पी.१९ | बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ[टीप 3] | ११ १८ |
सर्गिओ पेरेझ लान्स स्टोल |
सर्व सर्व | |||
अॅस्टन मार्टिन रेड बुल रेसिंग | रेड बुल रेसिंग होंडा रेसिंग एफ१ | रेड बुल रेसिंग आर.बी.१५ | होंडा आर.ए.६१९.एच | १० २३ ३३ |
पियरे गॅस्ली अलेक्झांडर अल्बोन मॅक्स व्हर्सटॅपन |
१-१२ १३-२१ सर्व | |||
रेनोल्ट एफ१ संघ | रेनोल्ट एफ१ | रेनोल्ट आर.एस.१९ | रेनोल्ट ई-टेक १९ | ३ २७ |
डॅनियल रीक्कार्डो निको हल्केनबर्ग |
सर्व सर्व | |||
रेड बुल टोरो रोस्सो होंडा | स्कुदेरिआ टोरो रोस्सो होंडा रेसिंग एफ१ | स्कुदेरिआ टोरो रोस्सो एस.टी.आर.१४ | होंडा आर.ए.६१९.एच. | २३ १० २६ |
अलेक्झांडर अल्बोन पियरे गॅस्ली डॅनिल क्वयात |
१-१२ १३-२१ सर्व | |||
रॉकीट विलियम्स रेसिंग | विलियम्स एफ१ मर्सिडीज बेंझ | विलियम्स एफ.डब्ल्यु.४२ | मर्सिडीज-बेंझ एम.१० ई.क्यु पावर+ | ६३ ८८ |
जॉर्ज रसल रोबेर्ट कुबिचा |
सर्व सर्व | |||
संदर्भ:[1][4][5][6][7][8][9][10][11][12][13] |
एफ.आय.ए संघटनेने २०१९ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक डिसेंबर ५, इ.स. २०१८ रोजी जाहीर केला.[14]
पहिल्या दहा वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवनाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण देण्यात आले:
निकालातील स्थान | १ला | २रा | ३रा | ४था | ५वा | ६वा | ७वा | ८वा | ९वा | १०वा |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
गुण | २५ | १८ | १५ | १२ | १० | ८ | ६ | ४ | २ | १ |
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[टीप 5] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[टीप 6]
जर चालक शर्यतीत पहिल्या दहा स्थानामध्ये वर्गीकृत झाला असेल तरच त्याला सर्वात जलद फेरीचे गुण देण्यात आले. केविन मॅग्न्युसेन ने सिंगापूर ग्रांप्री आणि वाल्टेरी बोटास ने ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये सर्वात जलद फेरीचे नोंद केले, पण त्यांना या प्रणाली प्रमाणे गुण नही देण्यात आले कारण ते दोघे शर्यतीत पहिल्या दहा स्थानामध्ये वर्गीकृत नाही होते.
डॅनिल क्व्याट आणि निको हल्केनबर्ग यांनी समान गुणांसह हंगाम संपविल्यामुळे, "काउंट-बॅक" प्रणालीचा वापर करुण टायब्रेकर सोडवण्यात आला. चालकाचा "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीचा वापर करुण गुण देण्यात आले. ज्यामुळे डॅनिल क्व्याटचा निकाल तिसऱ्या स्थानावर आणि निको हल्केनबर्गचा निकाल पाचव्या स्थानावर ठरवण्यात आला.
|
|
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
|
|
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्यामुळे त्यांना गुण देण्यात आले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.