From Wikipedia, the free encyclopedia
षांघाय, रूढ लेखन शांघाय, (अन्य लेखनभेद: षांगहाय, शांगहाय, शंघाई, शांघाई ; सोपी चिनी लिपी: 上海; पिनयिन: Shànghǎi; उच्चार: शांग-हाऽ-इ; (अर्थ: समुद्रकिनाऱ्यावरचे); वू: Zånhae; आयपीए: [zɑ̃'he]), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे[1]. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत्रांपैकी एक असलेल्या शांघाय महानगराची लोकसंख्या इ.स. २०१० सालच्या जनगणनेनुसार २ कोटी ३० लाख एवढी आहे. हे जगातले एक प्रमुख वित्तीय केंद्र असून मालाच्या आवकजावकीनुसार जगातील सर्वाधिक वाहतुकीचे बंदर[2] आहे.
शांघाय 上海市 |
|
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर) | |
वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : पूतोंगाची आकाशरेखा (शांघाय टॉवरसह), यू बाग, इ.स. २०१० एस्क्पोचे चीन पॅव्हिलियन, निऑन दिव्यांनी झगमगणारा नांजिंग रस्ता, शांघाय बांध |
|
गुणक: 31°12′0″N 121°30′0″E |
|
देश | चीन |
राज्य | - |
स्थापना वर्ष | ५ - ७ शतक |
महापौर | हान चंग |
क्षेत्रफळ | ७,०३७ चौ. किमी (२,७१७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३ फूट (४.० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,८८,८४,६०० |
- घनता | २,६८३.६ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.shanghai.gov.cn/ |
चिनाच्या पूर्व किनारपट्टीवरचे शांघाय यांगत्से नदीच्या मुखापाशी वसले आहे. शांघाय महानगर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा च्यांग्सू आणि च-च्यांग या प्रांतांना भिडल्या असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.