Remove ads
भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे (सप्टेंबर ४, इ.स. १९४१; सोलापूर, महाराष्ट्र) हे भारतीय मराठी राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री होते.
सुशीलकुमार शिंदे | |
कार्यकाळ जानेवारी १६, इ.स. २००३ – नोव्हेंबर १, इ.स. २००४ | |
मागील | विलासराव देशमुख |
---|---|
पुढील | विलासराव देशमुख |
कार्यकाळ इ.स. १९७४ – इ.स. १९९२ | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मागील | सुभाष देशमुख |
मतदारसंघ | सोलापूर |
कार्यकाळ इ.स. १९९९ – इ.स. २००४ | |
मागील | सुशीलकुमार शिंदे |
पुढील | सुभाष देशमुख |
मतदारसंघ | सोलापूर |
कार्यकाळ इ.स. १९९८ – इ.स. १९९९ | |
मागील | लिंगराज वल्याळ |
पुढील | सुशीलकुमार शिंदे |
मतदारसंघ | सोलापूर |
जन्म | सप्टेंबर ४, इ.स. १९४१ सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | अखिल भारतीय कांग्रेस |
पत्नी | उज्ज्वला शिंदे (महाजन) |
अपत्ये | ३ मुली (प्रणिती शिंदे) |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते आहेत.
सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्या वेळी शाळेत बसविलेल्या नाटकातही काम केले. न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली, तिच्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्एल्बीचे शिक्षण पूर्ण केले.
पोलिस निरीक्षक असल्याने सुशिलकुमार शिंदे यांचा राज्यकर्त्यांशी संबंध यायचा. पुढे मुंबईत एके दिवशी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट झाली. परिचय वाढत गेला. घट्ट मैत्री झाली. राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारणा झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीत कामास सुरुवात करण्याची तयारी दाखविली. पुन्हा नोकरीचा राजीनामा दिला. पवारांनी पुढे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार केले.
६ नोव्हेंबर १९७१ला शिंद्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ९ नोव्हेंबरपासून सोशॅलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
१९७२मध्ये सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून तिकीट मिळणार होते. मात्र, ते ऐनवेळी मिळाले नाही. पुढे या मतदारसंघाचे आमदार ताराप्पा सोनवणे यांचे आकस्मित निधन झाले. पोटनिवडणूक लागली. शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. विजय संपादन करून ते २३ एप्रिल १९७३ रोजी प्रथमच आमदार झाले.[१][२][३]
सुशील कुमार शिंदे यांची पाच-सात चरित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यांतली ही तीन :-
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.