नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.[2]
या http://mivanikar.blogspot.in/2014/01/blog-post_8426.html , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे. या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
अधिक माहिती दाखवा
प्रिय विकिसदस्य, विषयः प्रताधिकार संदर्भात आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे. विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते. मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी . महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
लिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा
काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा: १) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?)
२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.
३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो. ४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"
असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे. छायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती
आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही. सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;
असे का ? , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ? इत्यादी आणि अधिक माहिती...
स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे ?
स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ?
मतितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा. एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा. आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
ता.क.:
|
सप्तशृंगी हा भारताच्या हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.[3]या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला । आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे, परंतु आता शाकम्भरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत परंतु मुख्य शक्तीपीठ हे एक आहे सहारनपूर ।
देवीची मूर्ती ९ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार पैठणी / शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.
हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.[4]
सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदाय मध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे कि दत्त गुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानक पणे महादेव यांना कळत की कोणी तरी तपश्चर्या करत आहे ते बघण्या करिता ते दत्तगुरू याना पाठवता व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ''शाबरी विद्या''ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात.[5]
कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे
देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. व २०१८ पासून रज्जूमार्गाचा वापर सुरू झाला आहे.
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यांत भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य म्हणून असते असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो.
गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात. उत्सव काळात जास्तीच्या एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली असते. गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बस आहे.[6]
भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये २१४ खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय २४ तास उघडे असते. धर्मशाळेच्या खोलीसाठी आरक्षण पद्धत नाही. गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली एका दिवसासाठी मिळेल.
संस्थानातर्फे केवळ २० रुपये देणगी मूल्यामध्ये पोटभर प्रसादाची (भोजनाची) सोय करण्यात आली आहे. पौर्णिमा, नवरात्र व चैत्रात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. प्रसादलयात भाविकांसाठी सकाळी ११ ते २.३० व रात्री ७ ते ९.३० या वेळेत प्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एकावेळी एक हजार भाविकांची बसायची सोय आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.