Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते.[१] श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.[२]
ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात.[३] त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर इत्यादी भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली.[४] श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[५] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करते.[६]
वाल्हे
लोणंद
तरडगाव
बरड
वेळापूर
भंडी शेगाव
वाखरी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे
रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे २ प्रकारचे होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ व्या वर्षी २९ जून २०२४ रोजी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे[७] आणि १६ जुलै २०२४ रोजी माऊलींची पालखी पंढरपूर मध्ये पोहचणार आहे. माऊलींच्या पालखींचे पूर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे
दिनांक | पालखीचा मुक्काम |
---|---|
२९ जून २०२४ | प्रस्थान आळंदी |
३० जून २०२४ | भवानी पेठ, पुणे |
०१ जून २०२४ | पुणे |
०२ जुलै २०२४ | सासवड |
०३ जुलै २०२४ | सासवड |
०४ जुलै २०२४ | जेजुरी |
०५ जुलै २०२४ | वाल्हे |
०६ जुलै २०२४ | लोणंद |
०७ जुलै २०२४ | तरडगाव |
०८ जुलै २०२४ | फलटण |
१० जुलै २०२४ | बरड |
११ जुलै २०२४ | नातेपुते |
१२ जुलै २०२४ | माळशिरस |
१३ जुलै २०२४ | वेळापुर |
१४ जुलै २०२४ | भंडीशेगांव |
१५ जुलै २०२४ | वाखरी |
१६ जुलै २०२४ | श्री क्षेत्र पंढरपूर |
१७ जुलै २०२४ | एकादशी |
गोल रिंगण | |
---|---|
१२ जुलै २०२४ | पुरंदवडे |
१३ जुलै २०२४ | खुडूस फाटा |
१४ जुलै २०२४ | ठाकरबुवाची समाधी |
१५ जुलै २०२४ | बाजीरावची विहीर |
उभे रिंगण | |
---|---|
0८ जुलै २०२४ | लोणंद |
१५ जुलै २०२४ | बाजीरावची विहीर |
१६ जुलै २०२४ | वाखरी |
दिनांक | पालखीचा मुक्काम |
11 जून 2023 | आळंदीहून प्रस्थान[८] |
12,13 जून 2023 | पुणे मुक्कामी |
14,15 जून 2023 | सासवड |
16 जून 2023 | जेजूरी |
17 जून 2023 | वाल्हे |
18,19 जून 2023 | लोणंद |
20 जून 2023 | तरडगाव |
21 जून 2023 | फलटण |
22 जून 2023 | बरड |
23 जून 2023 | नातेपुते |
24 जून 2023 | माळशिरस |
25 जून 2023 | वेळापूर |
26 जून 2023 | भंडीशेगांव |
27 जून 2023 | वाखरी |
28 जून 2023 | पंढरपूर मुक्कामी |
29 जून 2023 | एकादशी |
उभे रिंगण | |
25 जून 2023 | माळीनगर |
27 जून 2023 | बाजीराव विहीर |
28 जून 2023 | पादुका आरती |
गोल रिंगण | |
19 जून 2023 | काटेवाडी (मेंढ्यांचे गोल रिंगण) |
20 जून 2023 | बेलवंडी |
22 जून 2023 | इंदापूर |
24 जून 2023 | अकलूज माने विद्यालय |
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते.यासाठी विविध कुटुंबातील बैल जोडीचे परीक्षण करून उत्तम असे बैल निवडले जातात. या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः त्यांच्या आश्र्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. यासाठी रथाच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो. या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारीमध्ये दिले जाते.[९]
वर्ष | मानकरी | गांव | बैलजोडीचे नाव |
---|---|---|---|
२०२४ | वस्ताद सहादू बाबुराव कुऱ्हाडे[१०] | आळंदी, पुणे | “हौश्या व बाजी’ आणि “माऊली व वजीर” |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.