Remove ads
वृत्त हे कविता रचनेचे प्रमाण आहे From Wikipedia, the free encyclopedia
वृत्त हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे. वृत्तास छंद असेही म्हणतात. वृत्तांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
पद्यातील ओळीमधील अक्षरांचे तीन-तीन अक्षरांचा एक असे गट पाडले जातात. शेवटी एक किंवा दोन २ अक्षरे शिल्लक उरू शकतात..एका गटातल्या तीन अक्षरांपैकी प्रत्येक अक्षर हे लघु किंवा गुरू असू शकते. लघु अक्षराच्या उच्चाराला गुरू अक्षराच्या उच्चारापेक्षा निम्मा वेळ लागतो.
अक्षरांतले अकार, इकार, उकार, ऋकार, अंकार, अःकार हे लघु; आणि आ-कार, ईकार, ऊकार, ॠकार, ए-ऐ-ओ-औ-कार हे गुरू समजले जातात.
अनुस्वारयुक्त अक्षर आणि विसर्गयुक्त अक्षर गुरू समजले जाते.
जोडाक्षर लघु(=ल) पण जोडाक्षराच्या आधीचे अक्षर त्यावर उच्चार करताना आघात येत असेल तर गुरू(=ग) समजले जाते. क्ष, ज्ञ ही जोडाक्षरे असल्याने त्यांच्या आधीचे अक्षर गुरू.
ओळीतले शेवटचे अक्षर नेहमीच गुरू(=ग) समजतात.
या तीन अक्षरी शब्दातील फक्त पहिले लघु(उदा० यमाचा), फक्त दुसरे लघु(उदा० राधिका), फक्त तिसरे लघु(उदा० ताराप) किंवा तीनही लघु(उदा० नमन) असे चार प्रकार संभवतात. त्यानुसार त्या तीन अक्षरी शब्दाचे य, र, त, न यांपैकी एक गण ठरतो.
किंवा या तीन अक्षरांमधले फक्त पहिले गुरू(उदा० भास्कर), फक्त दुसरे गुरू(उदा० जनास), फक्त तिसरे गुरू(उदा० समरा) किंवा तीनही गुरू(उदा० मानावा) असे चार प्रकार संभवतात. त्यानुसार त्या शब्दाचे भ, ज, स, म यांपैकी एक गण ठरतो.
हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी अनेक क्ऌप्त्या आहेत. त्या अश्या :-
१. पहिली पद्धत: श्लोक -
य-यमाचा, न-नमन । त-ताराप, र-राधिका ।
म-मानावा, स-समरा । ज-जनास, भ-भास्कर ॥
२.दुसरी पद्धत: हे गणांचे प्रकार यमाचा, राधिका, ताराप, नमन, भास्कर, जनास, समरा, मानावा या क्रमानेही लिहिले जातात. क्रम लक्षात ठेवण्यासाठी यरतनभजसम हा शब्द योजतात.
३. तिसरी पद्धत - यमाता, मातारा, ताराज, राजभा, जभान, भानस, नसल, सलगा किंवा यमाताराजभानसलगा.
४. चौथी पद्धत - पद्यात प्रत्येक अक्षर हे लघु (०) किंवा गुरू (१) असते. तीन अक्षरांचा एक गण होतो. पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे गणांचे २३ = ८ प्रकार होतात. ते प्रकार म्हणजे, न स ज य भ र त म.
००० नमन
००१ समरा
०१० जनास
०११ यमाचा
१०० भास्कर
१०१ राधिका
११० ताराप
१११ मारावा
अर्थात मात्रावृत्तांत लघुसाठी १ आणि गुरूसाठी २ मात्रा मोजल्या जातात. गण-पद्धतीचा उपयोग अक्षरगणवृत्ते बांधण्यासाठी होतो.
उदा०
रामदासांनी भरपूर वापरलेले भुजंगप्रयात वृत्त -
'य'या चार येती भुजंगप्रयाती.
यमाचा यमाचा यमाचा यमाचा
० १ १. ० १ १. ० १ १. ० १ १.
सदा सर्वदा भक्तिपंथेचि जावे.
० १ १.०१ १.० ११.० १ १.
पद्य चालीत म्हणताना जे अक्षर उच्चारल्यानंतर किंचित थांबावे लागते त्या थांबण्याला यती म्हणतात.
उदा० भुजंगप्रयात वृत्तातली ही ओळ :
क्रमानेच येती (यती) य चारी जयात ।
या ओळीत सहाव्या अक्षरानंतर थांबावे लागते, म्हणजे तेथे यती आहे.
कधी कधी नको असताना केवळ यती आल्याने शब्द दुभंगतो. अशा वेळी यतिभंग झाला असे म्हणतात.
उदा० -
पुढे माझा नारा (यती) यण तरुण तो (यती) पुत्र तिसरा ।
शिखरिणी वृत्तातल्या या ओळीत नारायण हा शब्द मध्येच तोडला गेला आहे.
चांगल्या काव्यात यतिभंग कमीत कमी असतात.
वृत्तबद्ध काव्य म्हणजे असे काव्य ज्यामध्ये विशिष्ट यमक आणि मात्रा योजना असते. यात प्रत्येक ओळी मध्ये समान अक्षर संख्या आणि मात्रा संख्या असते. मराठी वृत्तेतिहास हा मराठी साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. यात अनेक प्रकारचे वृत्ते समाविष्ट आहेत, प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट रचना आणि वैशिष्ट्ये आहेत. मराठी वृत्तेतिहासाची काही प्रमुख वैशिष्ट्ये:
मराठी वृत्तेतिहासाचे काही प्रमुख प्रकार:
मराठी वृत्तेतिहासातील काही प्रमुख कवी:
मराठी वृत्तेतिहास हा एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा आहे. याचा अभ्यास करून आपल्याला मराठी भाषेची आणि साहित्याची अधिक चांगल्या प्रकारे समज प्राप्त होऊ शकते.
ओवी: पावसाळा ऋतू आला, ढगांची रांग आली. पावसालांदी वारं वाहे, मन मोहून टाकते.
अभंग: विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल देवा. पंढरीची वारी करूया, विठ्ठलुका भेटू या.
श्लोक: श्रीगणेशाय नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते.
मराठी वृत्तबद्ध काव्य संग्रह: अनेक मराठी वृत्तबद्ध काव्य संग्रह उपलब्ध आहेत. तुम्ही ते वाचून वृत्तबद्ध काव्याची रचना आणि भाषा समजू शकता. काही प्रसिद्ध संग्रह पुढीलप्रमाणे आहेत: "वृत्तबद्ध मराठी काव्य" - संपादक: डॉ. रंजन केळकर "मराठी वृत्तेतिहास" - डॉ. गं. बा. सरदार "अभंग संग्रह" - संपादक: श्री. ग. दि. माडगूळकर
वृत्तबद्ध काव्यावर टीका आणि भाष्य: काही विद्वानांनी वृत्तबद्ध काव्यावर टीका आणि भाष्य लिहिले आहे. हे वाचून तुम्हाला वृत्तबद्ध काव्याची सखोल माहिती मिळू शकेल. काही प्रसिद्ध टीका आणि भाष्य पुढीलप्रमाणे आहेत: "वृत्तवती" - डॉ. रंजन केळकर "मराठी छंदोरचना" - डॉ. गं. बा. सरदार "अभंगांचे रसग्रहण" - श्री. ग. दि. माडगूळकर
http://www.manogat.com/node/383 Archived 2005-05-23 at the Wayback Machine.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.