विमानतळ(विमानाचा थांबा)(फ्रेंच:Aéroport, जर्मन:Flughafen, स्पॅनिश:Aeropuerto, इंग्लिश:Airport मराठीत उच्चार व लिखाण- एअरपोर्ट) :एक दळणवळणाचे स्थान/ठिकाण किंवा निश्चित मानव नियंत्रीत ठिकाण जे विमान उड्डाणाकरीता (निर्गमन) व उतरविण्याकरीता (आगमन) वापरले जाते. विमानाने आकाशात भरारी मारण्यासाठी व उतरण्यासाठी ज्या विशेष तांत्रिक सोयीसुविधा आवश्यक असतात त्या एका व्यावसायिक विमानतळावर उपलब्ध असतात. मोठी विमानतळे प्रवाशांच्या आगमन व निर्गमनाकरीता तसेच सामान व मालाच्या वाहतूकीकरता देखील वापरली जातात.मोठ्या विमानतळांवर विमानांच्या निर्वहन,बिघाड-दुरुस्ती व इंधन भरण्याची सोय अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केलेल्या असतात.
विमानतळावर विमान-उड्डाणासाठी व उतरविण्यासाठी आवश्यक असा सुयोग्य रस्ता आखलेला असतो त्यास धावपट्टी असे संबोधतात.हि धावपट्टी त्या त्या विमानतळाच्या वाहतू़क व वापरावर आधारीत लांबीची तसेच आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनिश्चित केलेली असते.जगातील पहिले नागरी विमानतळ अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील न्युजर्सी राज्यातील नेवार्क (Newark)या ठिकाणी बांधल्या गेले.
Remove ads
२०१४ साली जगातील खालील विमानतळांनी सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक केली.