वाडा तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
वाडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वाडा शहरात नगरपंचायत आहे.
?वाडा तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
आमदार | दौलत दरोडा |
तहसील | वाडा तालुका |
पंचायत समिती | वाडा तालुका |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 421303 • +०२५२६ • MH48 |
(१). हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून गणला जातो.
(२). तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे.
(३). येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते.
(४). येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इत्यादी कडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात.
(५). वाडा तालुक्याच्या बाजूला तानसा, भातसा, लोअर, मध्य व अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे शहरांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.
(६). या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
(७). महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.
(८). तालुक्यातील कुडूस येथे १०० वर्षांची परंपरा असणारा (उरूस) वार्षिक बाजार भरतो.
(९). या तालुक्यात इ. स.च्या पाचव्या व सहाव्या शतकात ६० फूटX२७ फूट लांबीरुंदीचे कोरीव काम असलेले खंडेश्वर मंदिराचे पुरातन अवशेष होते. तसाच असणारा शिलालेख मुंबईतील म्युझियममध्ये आहे.
(१०). तालुक्यातील मांगरूळ गावी बिटिशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत.
(११). 'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
(१२). कोलीम सरोवर हा या गावाजवळील डोंगरावर असणारा तलाव आहे.
(१३). 'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना दिसतात.
(१४). तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदिर, परशुराम मंदिर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो.
(१५). तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पर्यटन स्थळे आहे.
( १६ ) तालुक्यात अंबिस्ते गावी नागनाथ तीर्थ क्षेत्र आहे. तिथे शंकराच पुरातन मंदिर आहे..महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे खूप मोठी यात्रा भरते.
तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[1]
वाडा तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ६०३ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[2]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.