From Wikipedia, the free encyclopedia
गौरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे खानिवळी-पळसईफाटा मार्गाने गेल्यावर गौरापूर-कुडुस रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२८ कुटुंबे राहतात. एकूण १५५८ लोकसंख्येपैकी ७८१ पुरुष तर ७७७ महिला आहेत. गावाची साक्षरता ५८.१७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६४.६८ आहे तर स्त्री साक्षरता ५१.६४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.९३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
आंबिस्तेबुद्रुक, आब्जे, निचोळे, भावेहर, खानिवळी, पळसई, आसनास, कळमभाई, देवघर, बिळोशी, वासुरीखुर्द ही जवळपासची गावे आहेत.गौरापूर गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.