From Wikipedia, the free encyclopedia
लेख वावेंसा (पोलिश: Lech Wałęsa) (सप्टेंबर २९, इ.स. १९४३; पापोवो - हयात) हे पोलंडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी ते कामगार नेते होते
विद्युत उपकरणे दुरुस्त करणाऱ्या वालेंसाने आपली राजकीय कारकीर्द कामगार संघटनेपासून केली. त्यावेळच्या रशियाधार्जिण्या पोलिश सरकारने परवानगी शिवाय कामगार संघटना करणे बेकायदा ठरवले होते. परंतु वालेंसाने न्याय मिळवण्यासाठी इ.स. १९७० मध्ये ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील कामगार संघटित केले व त्याला सॉलिडारिटी (एकता) असे नाव दिले. यासाठी त्याने एक वर्ष तुरुंगात काढले. तेथुन बाहेर आल्यावरही वालेंसाने आपले कार्य चालुच ठेवले व नोकरी गमावली. याकाळात त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने जीवन चालु ठेवले. इ.स. १९८०च्या संपात वालेंसा कारखान्याची भिंत चढुन गेला व संपाचे नेतृत्व घेतले. संप एक वर्षाहून अधिक चालल्यावर पोलिश सरकारने लष्करी कायदा लागू केला व वालेंसाची तुरुंगात रवानगी केली. यादरम्यान संपाचे लोण देशभर पसरले व पोलिश सरकारच संकटात आले. वालेंसाला इ.स. १९८३चा नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आला. त्याने बक्षिसाची रक्कम सॉलिडारिटीला दिली.
पोलंडचे सरकार गडगडल्यावर इ.स. १९९०मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यात वालेंसाला पोलंडच्या अध्यक्षपदासाठी बहुमत मिळाले. पाच वर्षे सत्तेवर राहिल्यावर इ.स. १९९५च्या निवडणुकात तो हरला. त्यानंतर वालेंसा पोलंडचा राजदूत म्हणून जगभर प्रतिनिधित्त्व करतो.
इ.स. १९८३च्या नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त[1], वालेंसाला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके व खिताब मिळाले आहेत. बत्तीस अमेरिकन व युरोपीय विद्यापीठांनी त्याला पदव्या प्रदान केल्या आहेत [2] इ.स. १९८१मध्ये टाइम या नियतकालिकाने वालेंस त्या वर्षातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असल्याचे जाहीर केले. द ऑब्झर्वर व फायनान्शियल टाइम्सनी हा खिताब इ.स. १९८०मध्ये वालेंसाला दिला[2].
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.