मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश From Wikipedia, the free encyclopedia
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर (१० एप्रिल, १९३७- २५ जानेवारी, २०२५) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक होते.[१] न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते.[२] २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी संचालक आहेत.[३]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १०, इ.स. १९३७ बीड जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी २५, इ.स. २०२५ | ||
|
चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२ च्या अंकात त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.
फेब्रुवारी २०२३ मध्ये वर्धा येथे होणाऱ्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.[४]
चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर १९७९ ते १९८१ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची १९ जानेवारी १९९० मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून २० नोव्हेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. १० एप्रिल १९९९ रोजी ते निवृत्त झाले.[१]
Seamless Wikipedia browsing. On steroids.