Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
प्रा. दि.य. देशपांडे(जन्म : २४ जुलै, इ.स. १९१७, - ३१ डिसेंबर, इ.स. २००५) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवाद नावाची विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक हे मासिक सुरू केले. आपल्या पत्नी विदुषी मनू गंगाधर नातू यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांनी हे मासिक सुरू केले.[1] बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वचिंतक म्हणून ते प्रसिद्ध होते. तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले. ते नाना म्हणूनही ओळखले जात. नागपूर विद्यापीठात सांकेतिक तर्कशास्त्र हा विषय सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांचे सहकारी, मित्र आणि तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्र. ब. कुळकर्णी यांनी 'सुधारक दि. य. देशपांडे' या आदरांजलीपर लेखात 'दियं' यांचे यथार्थ व्यक्तिचित्रण केले आहे.[2]
मराठी वाचकांना तत्त्वज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी देशपांडे यांनी ‘आजचा सुधारक’ मासिक सुरू करून आगरकरप्रणीत विवेकवाद जोपासण्याचा आणि तत्त्वज्ञानाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला.
दि.य. देशपांडे यांनी अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान ही ग्रंथमाला लिहिली.
परामर्श (मराठी नियतकालिक)ाने प्रा. दि.य देशपांडे यांचे विचार सुस्पष्ट करण्यासाठी त्यांच्या हयातीत "प्रा. दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन" या नावाचा विशेषांक दोन खंडांत प्रसिद्ध केला. पहिल्या खंडात दोन विभाग आहेत तर दुसऱ्या खंडात तिसरा विभाग आहे. त्याशिवाय दि.य. देशपांडे यांनी अनुवाद केलेल्या लेखांचा वेगळा एक अनुवादित अंकही प्रसिद्ध केला.
प्रा. दि.य. देशपांडे यांच्या मराठी लेखनापैकी पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी जास्त अचूक माहिती देणारे तीन ग्रंथ - (१) प्रज्ञावाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, (२) अनुभववाद : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि (३) कांट : अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान. या तीनही ग्रंथांची रचना चिंतनासाठी व अभ्यासासाठी सुयोग्य आहे.
प्रत्येक खंडाची रचना दोन भागात एका विशिष्ट रीतीने केली आहे. पहिला भाग तत्त्ववेत्त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या तत्त्वज्ञान निर्मितीच्या पार्श्वभूमीचा व पूर्वसुरींच्या तत्त्वज्ञानाचा आणि शक्य होईल तिथे त्यांच्या सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीचा परिचय दिला आहे. खंडाच्या दुसऱ्या भागात तत्त्ववेत्यांनी आपले तत्त्वज्ञान ज्या ग्रंथात, लघुग्रंथात मांडले त्यातील त्यांचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणाऱ्या मुख्य निवडक वेच्यांचे, उताऱ्यांचे भाषांतर दिले आहे. हे भाषांतर दियंनी स्वतः केलेले आहे.
भाग १ : अ) कांटचा संक्षिप्त परिचय ब) कांटचे तत्त्वज्ञान
भाग २ : शुद्ध प्रज्ञेची चिकित्सा
सर्व पुस्तके बुकगंगा[6] वर उपलब्ध आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.