Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात. बुद्धीला 'प्रज्ञा' असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानुसार 'प्रज्ञा' हा ज्ञानाचा मार्ग आहे, असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism).
आपल्याला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियानी होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी. बुद्धी हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. त्याची फोड करणे महत्त्वाचे आहे.बुद्+धि. धि ही प्रत्येक प्राण्याकडे असते. बुद्धीच्या मार्गाने पंचेंद्रियाकडून आलेली माहिती एकगठ्ठा मेंदूत येते तिथे तिचे सूक्ष्म अलगीकरण (fragmentation) होऊन पुढील क्रिया केली जाते.हे सूक्ष्म अलगीकरण म्हणजे इंग्रजीमध्ये ratio. एखाद्या व्यक्तींची बुद्धी ही या सूक्ष्म अलगीकरण करणाच्या क्षमतेवरून ओळखतां येते.
इंग्लिशमधील Reason या शब्दाचे मूळ Rational या शब्दात आहे. Reason हा शब्द ॲंग्लो-नॉर्मन भाषेतील raisun किंवा जुन्या फ्रेंच भाषेतील raison पासून बनतो. तो लॅटीनमधील rationem पासून निष्पादित होतो. या सर्वांचे मूळ ratus, reor (“think”) यात आहे. त्यांचा अर्थ 'विचार करणे' असा होतो.[1] वेब्स्टर शब्दकोशानुसार Ratio, Ration, Ration, Rational Rationale, Rationalism, Rationalist, Rationalistic, Rationalistical, Rationalness इत्यादींचे मूळ Reason मध्येआहे.[2] ऑनलाईन डिक्शनरीनुसार ॲंग्लो- फ्रेंच भाषेत resoun असा शब्द आहे. त्याचा अर्थ द्रव्य, विषय, भाषा, विचार, भाषण, मत असा आहे. त्यापासून rationem बनतो. Reor हा शब्द ratusचे भूतकालीन रूप असून तो reri "to reckon, think पासून तयार होतो. तर reriचे मूळ प्रोटो-इंडियन-इंग्लिश मधील re(i)- "to reason, count" यात आहे. इंग्लिशमधील readचे मूळ या re/ reriत आहे.[3] त्यापासून resunmen, raisoner, rationare म्हणजे प्रश्न उपस्थित करणारा हे शब्द निष्पादित होतात. या सर्वांचा सामायिक अर्थ बोलणे, युक्तिवाद करणे, चर्चा करणे इत्यादी आहे. या सर्वातून व्यक्त होणारा reasonचा अर्थ 'सुज्ञता, पशुपासून माणसाचे भिन्नत्व दर्शविणारी बुद्धीची उच्च इयत्ता हा अर्थ तेराव्या शतकात प्रस्थापित झाला, 'तार्किक रितीने विचार करणे' हा अर्थ १५९० च्या दरम्यान सर्वमान्य करण्यात आला. त्यानंतर त्यात फारसा बदल झाला नाही.
हे अर्थ लक्षात घेऊन सतराव्या शतकास 'प्रज्ञेचे युग' म्हंटले गेले. Age of Reason "the Enlightenment ही म्हण १७९४ मध्ये प्रचलित झाली. थॉमस पेन (०९ फेब्रुवारी १७३७- २९ (किंवा जानेवारी १७३६ – ०८ जून १८०९) या इंग्लिश-अमेरिकन राजकीय सिद्धांतकर्ता, तत्त्ववेत्ता आणि क्रांतिकारकाने १७९४ साली लिहिलेल्या एका छोट्या ग्रंथाला दिलेल्या नावावरून हे नाव दिले गेले. त्याच्या ग्रंथाचे मूळ व संपूर्ण नाव होते The Age of Reason; Being an Investigation of True and Fabulous Theology. पेनने देववाद स्वीकारला पण प्रज्ञा आणि मुक्त विचार यांचा पुरस्कार केला. त्यामुळे त्याच्यावर ख्रिश्चन धर्मगुरूंचा रोष झाला.[4]
reason पासून निष्पन्न होणारा दुसरा शब्द म्हणजे rational. हा शब्द जुन्या फ्रेंच rationel, rational अथवा मध्ययुगीन लॅटीन भाषेतील rationale, rationalis पासून बनतो. त्याचा अर्थ बुद्धीशी निगडीत, योग्य कारणासहित.[5] Rationalला ism हा प्रत्यय लागून rationalism हा शब्द निष्पन्न होतो. नंतर rationalist, rationality या संज्ञा होतात. त्याचा समानार्थी शब्द intellectualism.[6] Ismचे मूळ प्राचीन ग्रीक भाषेतील एका संज्ञेत आहे की ज्याचा इंग्लिश उच्चार एकतर ismós असा होतो किंवा isma असा होतो. पहिल्याचा अर्थ कृती, अट, सिद्धान्त आणि दुसऱ्याचा अर्थ पूर्ण केलेली कृती' असा होतो.[7] त्यास icism हा प्रत्यय लागून इतर शब्द बनतात. जसे की criticism.
भारतात ration card किंवा coupon हा शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ नियंत्रित दराने मिळणारे नियंत्रित मोजमापाचे अन्नधान्य. अमेरिकन यादवी युद्धात[8] आणि पहिल्या महायुद्धात सैनिकांना अन्नधान्य, मद्य, सिगारेट, कपडे इत्यादी वस्तू देण्यासाठी मुख्यतः हा शब्द वापरण्यात आला. त्यासाठी सैनिक व अधिकारी वर्गास त्यांच्या दर्ज्यानुसार वस्तूंच्या पुरवठ्याचे प्रमाण ठरवून ज्या नोंदपत्रकावर पुरवठ्याची ही नोंद केली जात असे त्यास ration card असे नाव देण्यात आले. देशातील एकूण उत्पादनापैकी प्रथम सैनिकांना हा पुरवठा होई. त्यानंतर नागरिकांना पुरवठा केला जाई. त्यामुळे नागरिकांनाही असे ration card देण्यात आले.[9] अर्थात सैनिकांना जास्त आणि नागरिकांना कमी पुरवठा असे धोरण असते. येथे rationचा अर्थ 'अमुक कारणामुळे नियंत्रित प्रमाणात देण्यात येणारे अन्नधान्य' असे समर्थन गृहीत धरले आहे. समर्थन ही बौद्धिक, तार्किक कृती आहे. तिच्यामागे निश्चित कारण असते. त्यामुळे यास rationalization असे म्हणतात.
'बुद्धी' हा Reason या इंग्लिश शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आपण मान्य करतो(?); मात्र ते फारसे योग्य नाही, असे मत महाराष्ट्रातील विवेकवादी तत्त्ववेत्ते दि. य. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, इंग्लिशमधील intellect, intelligence आणि reason या तिन्ही शब्दांचे मराठी भाषांतर 'बुद्धी' असे केले जाते(?) पण मुळात या तिन्ही इंग्लिश शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. 'बुद्धी' या शब्दातून ते तीन भिन्न अर्थ व्यक्त होऊ शकत नाहीत. बुद्धी (intelligence) ही शक्ती सर्व प्राण्यात थोड्याफार प्रमाणात असते आणि म्हणून ती मानवप्राण्यातही आहेच. पण पशुपक्ष्यांच्या ठिकाणी intellect आणि reason आहे, असे आपण म्हणत नाही. Intellect आणि Reason हे दोन्ही शब्द स्थूलमानाने समानार्थी शब्द आहेत. त्यांनी बुद्धीची श्रेष्ठ दर्जाची शक्ती व्यक्त होते. त्यामुळे या शब्दांना 'बुद्धी' हा पर्याय न वापरता 'प्रज्ञा' हा मराठी शब्द वापरावा, असे ते सुचवितात. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी 'बुद्धी' आहे, पण त्यांच्या ठिकाणी 'प्रज्ञा' आहे, असे आपण म्हणत नाही.[10]
वेगळ्या भाषेत हे अधिक स्पष्ट करावयाचे तर 'बुद्धी'चे अधिक प्रगल्भ रूप म्हणून 'प्रज्ञा' (Reason) या शब्दाचे उपयोजन केले जाते. बुद्धी ही क्षमता ज्ञानाचा विषय असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तू, व्यक्ति, घटना यात फरक करू शकते. या बुद्धिचा विकास माणसाने केला. ज्ञानाचा विषय असणाऱ्या ज्ञेयातील चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, सत्य-असत्य असा भेद करून निवड करते आणि त्या निवडीचे कारणासहीत समर्थन (Justification) देते, ती बुद्धिची अधिक प्रगत अवस्था समजली जाते, या अवस्थेला 'प्रज्ञा' म्हणावे, असा संकेत आहे. निवड करणे ही जाणीवपूर्वक केलेली कृती असते. या पार्श्वभूमीवर Reason या शब्दाचे भाषांतर 'प्रज्ञा' असे करणे योग्य ठरेल. या विश्लेषणानुसार 'प्रज्ञा' हाच ज्ञानाचा मार्ग आहे असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism)[11] होय.
'बुद्धी' या शब्दासाठी प्रज्ञा, विवेक आणि बुद्धिप्रामाण्य(?) असे शब्द मराठीत वापरले जातात, म्हणून प्रज्ञावादास विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद असेही नाव आहे.
विवेक हा संस्कृत शब्द 'विच्' या धातूपासून बनतो. विच् म्हणजे भेद करणे. भेद करण्याचे सामर्थ्य असणे, हा विवेक मानला जातो. विच् म्हणजे अभ्यास. विविच् < विवेक.[12] प्रज्ञा निवड करते, विवेक करते. म्हणून विवेकवाद असे नाव आहे.'विवेकिन्', -विवेक्तृ म्हणजे विचारी, समंजस आणि म्हणून न्यायाधीश, तत्त्ववेत्ता.[13]
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
* या लेखात वापरलेल्या मराठी-इंग्रजी संज्ञा, उपयुक्त पारिभाषिक शब्दांचे अर्थ यादी | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
* या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी संज्ञा, उपयुक्त पारिभाषिक शब्दांचे अर्थ यादी | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.