इम्मॅन्युएल कांट

From Wikipedia, the free encyclopedia

इम्मॅन्युएल कांट

इम्मॅन्युएल कांट (एप्रिल २२, इ.स. १७२४:क्योनिग्सबर्ग, प्रशिया - फेब्रुवारी १२, इ.स. १८०४) हा १८व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. टीकात्मक तत्त्वज्ञानामध्ये त्याला रुची होती. कोनिग्जबर्ग विद्यापीठात त्याने न्यायशास्त्र व अध्यात्मशास्त्र हे विषय ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शिकवले. जर्मन विद्वानांमध्ये कांटचे स्थान महत्त्वपुर्ण आहे.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष प्राकृतिक भूगोल आणि मानववंशशास्त्र याकडे केंद्रीत केले.त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांची कोनिंगसबर्ग विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.ते आपल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करत असत.त्यांचे असे मत होते की इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.दोन्हीं विषय गरजेचे विज्ञान असून पद्धतशीर विज्ञान म्हणूनही एकत्र आहेत.यांच्या शिवाय मानव पृथ्वी विषयी संपूर्ण माहिती मिळवू शकत नाही.याचबरोबर त्याने भूगोल विषयाच्या पाच शाखा ही सांगितल्या आहेत.

जलद तथ्य इम्मॅन्युएल कांट, जन्म नाव ...
इम्मॅन्युएल कांट
Thumb
जन्म नाव इमॅन्युएल कांट
जन्म २२ एप्रिल १७२४
कॉनिग्सबर्ग, प्रशिया; आताचे कॅलिनिनग्राड, रशिया
मृत्यू १२ फेब्रुवारी १८०४
कॉनिग्सबर्ग, प्रशिया
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य
बंद करा

लेखन

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.