तिवसा विधानसभा मतदारसंघ

From Wikipedia, the free encyclopedia

तिवसा विधानसभा मतदारसंघ - ३९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार तिवसा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका, मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, धामणगांव ही महसूल मंडळे, अमरावती तालुक्यातील शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव ही महसूल मंडळे आणि भातकुली तालुक्यातील आष्टी, खोलापूर ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. तिवसा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

तिवसा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • तिवसा तालुका
  • मोर्शी तालुका : नेर पिंगळाई आणि धामणगांव महसूल मंडळे
  • अमरावती तालुका : शिराळा, माहुली जहांगीर, नांदगांव पेठ आणि वालगांव महसूल मंडळे
  • भातकुली तालुका : आष्टी आणि खोलापूर महसूल मंडळे

तिवसा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

अधिक माहिती वर्ष, आमदार ...
वर्ष आमदार पक्ष
१९७८ पूर्वी: चांदूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९७८ चंद्रकांत रामचंद्र ठाकूर अपक्ष
१९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ शरद मोतीराम तसारे भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१९९० नट्टु देवाजी मांगले भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९९५ शरद मोतीराम तसारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९९ साहेबराव रामचंद्र थत्ते भारतीय जनता पक्ष
२००४
२००९ अ‍ॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४
२०१९
२०२४ राजेश श्रीरामजी वानखडे भारतीय जनता पक्ष
बंद करा

निवडणूक निकाल

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९, तिवसा ...
बंद करा

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.