भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे.या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड डांगे उर्फ श्रीपाद अमृत डांगे यांनी केली. अन्य पक्षांच्या तुलनेत हा पक्ष वेगळा आहे.ह्या पक्षाचे विचार पूर्णपणे मार्क्सवादी आहेत. कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्थेचा या पक्षावर संपूर्ण प्रभाव प्रभावित आहे. भारतात काँग्रेस पक्षानंतरचा हा सर्वात जुना पक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी नसून माओवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्ष हिंसेचे समर्थन करतो.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष | |
---|---|
सचिव | ए.बी. वर्धन |
स्थापना | १९२० |
मुख्यालय | अजय भवन, कॉम्रेड इंद्रजित गुप्ता मार्ग, नवी दिल्ली |
युती | डावी आघाडी |
लोकसभेमधील जागा | ४ |
राज्यसभेमधील जागा | ५ |
राजकीय तत्त्वे | साम्यवाद |
संकेतस्थळ | सीपीआय.ऑर्ग |
महत्त्वाचे नेते
- ए.बी. वर्धन
पुस्तके
पुण्यामध्ये पीपल्स बुक हाऊस व मुंबईत लोकवाङ्मय गृह ही दुकाने साम्यवादी वाङ्मय मिळण्याचे प्रमुख ठिकाणे होती. आजही ही दुकाने आहेत, पण त्यांत इतरही पुस्तके मिळतात.
लोकवाङ्मय प्रकाशनाने शेकडो पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. एक मोठी यादी [permanent dead link]येथे आहे.
त्या यादीत नसलेल्या काही पुस्तिका
- गोवा मुक्तिसंग्रामात कम्युनिस्टांचे योगदान (प्रा. आनंद मेणसे)
- दुमदुमली ललकार .. (अविनाश कदम)
- निजामशाहीविरोधात कम्युनिस्टांचा लढा (ॲडव्होकेट भगवानराव देशपांडे)
- भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्ट पक्षाचे योगदान (प्रा. आनंद मेणसे)
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि गिरणी कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्राचा लढा (संजय चिटणीस)
- संयु्क्त महाराष्ट्राचा लढा आणि कम्युनिस्ट पक्ष : स्फूर्तिदायी स्मरण (विजय गणाचार्य)
साम्यवाद |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.