Remove ads

चाणक्य (इतर नावे: विष्णूगुप्त, कौटिल्य) (कालमान: अनुमाने इ.स.पू. ३५०च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. अत्याचारी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या धोरणास 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, योगेश्वर याज्ञवल्क्याने लिहिलेली याज्ञवल्क्य स्मृतीवात्सायनाने लिहिलेले कामसूत्र हे ग्रंथ. पंचतंत्र या विख्यात ग्रंथाचा कर्तादेखील ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.

Remove ads

प्रारंभिक आयुष्य

चाणक्याच्या प्रारंभिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी विख्यात आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य किंवा विष्णूगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चणक' या प्रतिभावंत शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक कुटुंबाचे जगणे असाह्य झाल्याने विष्णूगुप्ताने तक्षशिलेला प्रस्थान केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तक्षशिला विद्यापीठातच राजकारण व अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन चालू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजकारण व आर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाले. त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडित नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात सन्माने घेतले जात होते. कैकेय देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णूगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने सज्जता म्हणून त्याने आपले शिष्य सज्ज केले होते, त्यांत चंद्रगुप्त मौर्य सुद्धा होता. त्याला चाणक्याने मगध देशाचा राजा बनविला.

Remove ads

अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण

अलेक्झांडरचे भारतावरील हल्ला चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या हल्लेला सामोरे जाणे केवळ भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णूगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. पण सुरुवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. पण वेगवेगळ्या राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. याउलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून पोरसविरुद्ध लढण्यास साह्यत्ता केली. पोरस ने अलेक्झांडरचा झेलम नदीच्या काठी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात मगध साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. पण चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोपर्यंत या अपमानाचा सूड घेणार नाही तोपर्यंत आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा विख्यात आहे. अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कथा ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने मॅसेडोनियाला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षत्रपांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती.

ग्रीक सत्तेविरुद्ध युद्ध

तक्षशिलेला परतल्यावर चाणक्याने आपल्या शिष्यांना संघटित करून ग्रीकांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित केले व शिष्यांद्वारे जनजागृतीचे कार्य करून घेतले. चंद्रगुप्तने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांविरुद्धच्या उपक्रमाला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. चाणक्यच्या नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांद्वारे ग्रीक सैन्यातील केवळ ग्रीकांवर हल्ले करण्यात येत होते व भारतीयांना जीवदान देण्यात येत होते. यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची दुग्धा मनोभाविकता झाली. तसेच ग्रीक सैनिकांचाही विश्वास कमी झाला. यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांची सेवेतून हकालपट्टी झाली व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले. चाणक्याने तक्षशिलेला आपल्या विजयाचे ध्येय बनविले. त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली. चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून ग्रीकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले. पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्यालाही बसत होती. पण चाणक्याने पोरसला इंद्रदत्ताद्वारे या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले त्यामुळे ग्रीकांची लाचारी आणखी वाढली. चाणक्याच्याच पारंगत धोरणांमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसच्या राज्याला जोडला गेला. त्यामुळे पोरसचा चाणक्यांवर विश्वास वाढला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या साह्याने मगधवर हल्ला करण्याचे ठरविले.

मगधचे सत्तांतर

चाणक्याने त्याच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी व मगधच्या धनानंद राजाच्या अत्याचारातून प्रजेला सोडविण्यासाठी चंद्रगुप्तास मगध जिंकण्यास पाठविले होते.

Remove ads

आधुनिक भारतात

  • चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या हस्तलिखिताचा इ.स. १९०५ वर्षी शोध लागला व डॉ. शामाशास्त्री या जगविख्यात संस्कृत भाषातज्ज्ञाने त्याचा इ.स. १९१५ वर्षी इंग्लिश भाषेतील भाषांतर प्रसिद्ध केला. तो शामाशास्त्रींचा भाष्यासह उपलभ्य आहे. या विषयावरील राधाकृष्णन पिल्ले यांचे 'कॉरपोरेट चाणक्य' हेही पुस्तक प्रसिद्ध आहे.
  • आर्य चाणक्याच्या ग्रंथाचे काका गाडगिळांनी ’ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या नावाचे मराठी भाषांतर लिहिले आहे.
  • कौटिलीय अर्थशास्त्र प्रदीप (लेखक - गोविंद गोपाळ टिपणीस)
  • चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी भाषांतर - राजेश आजगावकर)
  • चाणक्य विष्णूगुप्त (नाटक, गो.पु. देशपांडे))
  • दूरचित्रवाणीवर 'चाणक्य' नावाची एक मालिका होती (८-९-१९९१ ते ९-८-१९९२); मालिकेवे लेखन, दिग्दर्शन आणि तिच्यातले चाणक्याचे काम चंद्रप्रकाश द्विवेदीने केले होते. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर एवढी बिंबली होती की अनेकांनी त्यानंतर हिंदी भाषेतील मालिका पाहणे बंद केले.
  • अभिनेता मनोज जोशी हिंदी-मराठी नाटकांत काम करतात. त्यांची प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेल्या चाणक्य या नाटकाने रंगभूमी गाजवली आहे.
  • नीरज पांडे यांचा 'चाणक्य' नावाचा हिंदी भाषेतील चित्रपट आहे, त्यात चाणक्याची भूमिका अजय देवगण यांनी केली आहे.
  • दूरचित्रवाणीवर ११ मार्च २०११ ते ७ डिसेंबर २०१२ या काळात चंद्रगुप्त मौर्य नावाची हिंदी भाषेतील मालिका चालू होती. तिच्यात चाणक्याचे काम मनीश वाधवा याने केले होते.
  • चंद्रगुप्ताच्या आयुष्यावर विशाखादत्त याने लिहिलेले 'मुद्राराक्षस' नावाचे संस्कृत नाटक आहे. या नाटकावरून चाणक्य नावाची कोणी व्यक्ती होती असा पहिल्यांदा शोध लागला. चाणक्याची सर्व माहिती बहुधा 'मुद्राराक्षस'मधूनच मिळाली. नाटकाचे मराठी भाषांतर अंजली पर्वते यांनी केला आहे.
  • नाटककार ल.मो. बांदेकर यांचे गाजलेले नाटक म्हणजे ’आर्य चाणक्य’. मुंबईत 'आविष्कार' या नावाजलेल्या प्रायोगिक नाट्यसंस्थेने त्यांचे हे नाटक सादर केले होते. त्याचे दिग्दर्शन आणि त्यातील प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. 'आर्य चाणक्य' चे प्रयोग महाराष्ट्रात सर्वदूर झाले. पाचशेहून अधिक प्रयोगांचा पल्ला या नाटकाने गाठला.
Remove ads

चाणक्याच्या जीवनावरील आणि वाङ्मयावरील पुस्तके

  • अक्षथ्य विचारधन चाणक्य
  • आचार्य चाणक्य (धूमकेतू)
  • आर्य (कादंबरी, लेखक - डाॅ. वसंत पटवर्धन)
  • आर्य चाणक्य (नाटक, लेखक - ल.मो. बांदेकर)
  • आर्य चाणक्य (अनेक भाग, बाळशास्त्री हरदास)
  • आर्य चाणक्य. (जनार्दन ओक)
  • आर्य चाणक्य (राम प्रधान)
  • आर्य चाणक्य (चरित्र, लेखिका - संध्या शिरवाडकर)
  • आर्य चाणक्य (ह.अ. भावे)
  • आचार्य चाणक्य (ज्ञानदा नाईक, प्रताप मुळीक)
  • कथा चाणक्य (मूळ इंग्रजी, राधाकृष्णन पिल्लई; मराठी भाषांतर राजेश आजगांवकर)
  • कॉर्पोरेट चाणक्य (अनिता एस.आर. वाझ, लुईस एस.आर. वाझ)
  • कौटिलीय अर्थशास्त्र - दोन खंड (ज.स. करंदीकर, संस्कृत पंडित बळवंत रामचंद्र हिवरगावकर यांच्या सहकार्याने, १९२७)
  • कौटिलीय अर्थशास्त्र (डाॅ. वसंत पटवर्धन)
  • गोष्टीरूप चाणक्य (श्रीकृष्ण स. जोशी)
  • ग्यानबाचे अर्थशास्त्र (लेखक काकासाहेब गाडगीळ)
  • चंद्रगुप्त व चाणक्य (लेखक - हरि नारायण आपटे)
  • चाणक्य (आनंद साधले)
  • चाणक्य (कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
  • चाणक्य (महादेवशास्त्री जोशी)
  • चाणक्य (विश्वास दांडेकर)
  • चाणक्य (बालसाहित्य, लेखक -सुबोध मुजुमदार)
  • चाणक्य चरित्र (ह.अ. भावे)
  • चाणक्यनीति (आश्विनी पाराशर)
  • चाणक्यनीति (उन्मेष गुजराती)
  • चाणक्यनीति (गोविंदसिंह)
  • चाणक्यनीति (ज्वालाप्रसाद शास्त्री)
  • चाणक्यनीति (भोसले)
  • चाणक्यनीति (रामकृष्णराव)
  • चाणक्यनीति (रूप)
  • चाणक्यनीति (वा.ल. मंजूळ)
  • चाणक्य नीतिदर्पण
  • चाणक्य नीतिसार (डॉ. मधुसूदन घाणेकर)
  • चाणक्य नीती (अश्विनी पराशर)
  • चाणक्यनीती भाग १, २, ३ (स.ह. जोशी)
  • चाणक्य नीती. भाग १, २. (ह.अ. भावे)
  • चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी भाषांतर - राजेश आजगावकर)
  • चाणक्य विष्णूगुप्त (नाटक, गो.पु. देशपांडे)
  • चाणक्य सूत्रे (दत्तात्रेय परशुराम चिंचाळकर)
  • चाणक्यांची जीवनसूत्रे (सुधाकर घोडेकर)
  • चाणक्यांची जीवनसूत्रे (सुहास खांडेकर)
  • चाणक्याची तीन पुस्तके (भा.द. खेर, अनंत पै, श्री सर्वोत्तम प्रकाशन)
  • चाणक्याची सार्थ संस्कृत सुभाषिते (वृद्धचाणक्य) (संपादक - ह.अ. भावे)
  • चाणाक्ष (बाबू गंजेवार)
  • जगात वागावे कसे? हे सांगणारी प्राचीन चाणक्यनीती (राजेश प्रकाशन)
  • महामात्य चाणक्य (धूमकेतू)
  • मुद्राराक्षस (संस्कृत नाटक, लेखक - विशाखदत्त; मराठी भाषांतर - अंजली पर्वते)
  • राष्ट्रधर्माचे आचार्य, आर्य चाणक्य (डॉ. प्रभाकर पाठक)
  • संपूर्ण चाणक्यनीति (इंदुभूषण बढे)
  • सार्थ चाणक्यनीती (संजय नाईक)
  • सूत्रे चाणक्याची, सूत्रे गव्हर्नन्सची (डॉ. वसंत गोडसे)
Remove ads

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads