ह.अ. भावे

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads
Remove ads

ह.अ. भावे (जन्म - जानेवारी २१ इ.स. १९३३ मृत्यू - १८ जून, इ.स. २०१३)
ह.अ.भावे हे डोंबिवली येथे मार्च ३१ इ.स. १९९१ रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्यही होते.

पुण्यातील वरदा प्रकाशन व सरिता प्रकाशन या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी जुन्या बाजारात विविध भाषांतील पुस्तकांचा शोध घेतला. त्यांचे प्रताधिकार विचारात घेऊन पुस्तकांचे स्वतः भाषांतर करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, पंचतंत्र, विज्ञाननिष्ठा आणि संस्कृती, लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. वा.गो. आपटे संपादित 'शब्द रत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.[]

Remove ads

ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठीत आणलेली काही पुस्तके

  • अण्णा हजारे यांचे चरित्र
  • अभ्यासाचे नवे तंत्र (मुलांसाठी)
  • आत्‍मविश्वासाचा चमत्कार - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
  • आत्मविकासाचा सोपा मार्ग - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'बी गुड टू यूवरसेल्फ' ह्या प्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद.
  • आत्मविकासाची पायाभरणी - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'मेकिंग युवरसेल्फ' ह्या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद
  • आदर्श विद्यार्थी जीवन - 'कॅरॅक्टर, कर्टसी अँड क्लीनलीनेस’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
  • आदर्श व्यक्तिमत्त्व
  • आनंदी जीवन - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी यंग मॅन एंटरिंग बिझिनेस' या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद
  • आपली नक्षत्रे
  • आपल्या पायावर उभे रहा
  • आफ्रिकेचा शोध
  • आलेली सुसंधी सोडू नका - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
  • आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य
  • ऑस्ट्रेलियाचा शोध
  • आहे त्यात भागवा
  • आळसावर मात करा !
  • इच्छाशक्तीचे बुलंद बुरुज
  • एक गुलाम ओलायुदाह इक्विनो याचे आत्मचरित्र (अनुवादित, मूळ लेखक ओलायुदाह इक्विनो)
  • एकादशी माहात्म्य
  • एकाग्रता
  • एडिसन चरित्र -
  • Collection Of Good Thoughts
  • कोलंबसाचे चार प्रवास
  • चाणक्य चरित्र
  • चाणक्य नीती भाग १, २, ३.
  • चारित्र्य - सॅम्युएल स्माईल्स यांच्या Character ह्या पुस्तकाचा भावानुवाद.
  • चिकाटीची गुरुकिल्ली
  • चिंता सोडा सुखाने जगा - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी कॉँक्वेस्ट ऑफ वरीज या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
  • चिरंतन आशावाद - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी अ‍ॉप्टिमिस्टिक लाईफ' ह्या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
  • Dictionary Of Good Thoughts -
  • Dictionary Of Proverbs
  • दशकुमारचरित
  • धनयोग रहस्य
  • ध्येयनिष्ठा - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी यंग मॅन एंटरिंग बिझिनेस' या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद
  • ध्येयापुढती गगन ठेंगणे - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'ही कॅन, हू थिंक्स ही कॅन' या प्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद.
  • बत्तीस शास्त्रज्ञ
  • बालक व पालक
  • बालकुमारांसाठी श्यामची आई - [साने गुरुजी]] यांच्या मूळ पुस्तकाची संस्कारित आवृत्ती
  • भय भावनेतून मुक्त व्हा (मूळ लेखक स्वेट मार्डेन)
  • भारताकडून आम्ही (इंग्लंडने) काय शिकावे ? - म‍ॅक्समुल्लर यांची १८८२ मधील मूळ इंग्रजीतील सात भाषणे व त्यांचा मराठी अनुवाद, अधिक लोकमान्य टिळकांचा मृत्युलेख व विवेकानंदांचा लेख यांसह.
  • भारतीय उच्चांक
  • यशाची द्वारे
  • संस्कृत सुभाषितांचे संग्रह (संपादित व स्व-अनुवादित)
    • अकराशे अकरा सार्थ संस्कृत सुभाषिते
    • अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते
    • चाणक्याची सार्थ संस्कृत सुभाषिते
    • चारशे सार्थ संस्कृत सुभाषिते
    • तीनशे‍एक सार्थ संस्कृत सुभाषिते
    • तीनशेदोन सार्थ संस्कृत सुभाषिते
    • दीडशे सार्थ संस्कृत सुभाषिते
    • दोनशे सार्थ संस्कृत सुभाषिते
    • पाचशे सार्थ संकृत सुभाषिते
    • महाभारतातील पाचशे सार्थ सुभाषिते
    • महाभारतातील हजार सार्थ सुभाषिते
    • योगवासिष्ठातील पाचशे सार्थ सुभाषिते
    • शंभर सार्थ संस्कृत सुभाषिते
    • श्रीमद्भागवतातील पाचशे सार्थ सुभाषिते
    • सातशे सार्थ संस्कृत सुभाषिते
    • सार्थ सुभाषिते रत्‍नखंडमंजूषा
  • ज्ञानकण गोळा करा - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'मेकिंग युवरसेल्फ' ह्या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद



((अपूर्ण)

Remove ads

संदर्भ आणि नोंदी

Loading content...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads