कामसूत्र
From Wikipedia, the free encyclopedia
महर्षी वात्सायन यांनी स्त्री-पुरुषांमधील लैंगिक व इतर संबंधावर लिहिलेला कामसूत्र हा एक प्राचीन ग्रंथ आहे. माणसाच्या कामजीवनावर लिहिलेला हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. वात्सायनांनी या विषयाच्या संदर्भात विचारात घेण्यासारख्या विविध बाबींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. त्यांनी गुप्त साम्राज्याच्या काळात हा ग्रंथ लिहिला.
भाषांतरे
ब्रिटिश संशोधक व भाषांतरकार सर रिचर्ड बर्टन यांनी १८५५- १८६० मधील भारतातील वास्तव्यात या ग्रंथाचा अभ्यास केला व नंतर १८७० च्या दशकात त्यांनी या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित करून हा ग्रंथ संपूर्ण जगात प्रसिद्ध केला.
मराठीत
कथाकार दि.बा. मोकाशी (१९१५-१९८१) यांची १९७८ मध्ये ‘वात्स्यायन’ ही चरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली. अतिशय रोचक व उद्बोधक अशी कादंबरी असूनही तिची दखल घेतली गेली नाही. अलीकडच्या काळातील नैतिक-अनैतिक या वादात सापडलेल्या समाजाला वैचारिक दिशा देणारी हे अभिजात साहित्य आहे. दि.बा. मोकाशी यांची कन्या ज्योती कानिटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर -कामसूत्रकार वात्सायन- जानेवारी २०१४ मध्ये अमेझॉनवर टाकले आहे.[१] त्यांच्या २०१५ या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांमधून साहित्याचा आढावा घेण्यात आला.[२]
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.